मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सचा नवीन स्मार्टफोन कॅनवास नायट्रो 3 ला कंपनीच्या अधिकृत साइटवर लिस्ट केले गेले आहे. सध्यातरी कंपनीकडून ह्या स्मार्टफोनबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
त्याचबरोबर मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोनला एक तिस-या पार्टीच्या ऑनलाइन रिटेल वेबसाइटवर 8,130 रुपयाच्या किंमतीत लिस्ट केले गेले आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा कॉर्निंग गोरिला ग्लान 3 ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 1.4GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक(MT6592) प्रोसेसर आणि 2GB रॅमसुद्धा आहे. हा स्मार्टफोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. मायक्रोमॅक्स कॅनवास नायट्रो 3 (ई532) हँडसेट अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो आणि हा एक ड्युल सिम (GSM+GSM) डिवाइस आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. दोन्ही कॅमेरे फ्लॅश सपोर्टसह येतात. हा स्मार्टफोन 2500mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G(HSPA+), वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.0, मायक्रो-USB 2.0, GPS/A-GPS आणि 3.5mm ऑडियो जॅक फीचर आहे. हँडसेटमध्ये 4G कनेक्टिव्हिटी नाही. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 144.3x72x8.7mm आहे. हा हँडसेट एक्सलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसह येईल.