असे सांगितले जातय की, कंपनी ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला लवकरच बाजारात आणेल. त्याशिवाय हा मायक्रोमॅक्स कॅनवास मेगा स्मार्टफोन एका थर्ड पार्टी रिटेलरच्या वेबसाइटवर ८,०९९ रुपयात उपलब्धसुद्धा आहे.
मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सचे दोन नवीन स्मार्टफोन्स कॅनवास मेगा आणि कॅनवास अमेजला कंपनीने आपल्या अधिकृत साइटवर लिस्ट केले आहे. त्याचबरोबर असे सांगितले जातय की, कंपनी ह्या दोन्ही स्मार्टफोन्सला लवकरच बाजारात आणेल. त्याशिवाय हा मायक्रोमॅक्स कॅनवास मेगा स्मार्टफोन एका थर्ड पार्टी रिटेलरच्या वेबसाइटवर ८,०९९ रुपयात उपलब्धसुद्धा आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास मेगा स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ने संरक्षित आहे. त्याचबरोबर ह्यात 1.4GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅम दिली आहे. ह्यात 4GBचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते.
ह्यात १३ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंगचा कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. मायक्रोमॅक्स कॅनवास मेगा(E353) एक ड्युल सिम डिवाइस आहे जो आउट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड ५.० लॉलीपॉपवर चालतो. स्मार्टफोनमध्ये २८२० ची बॅटरी दिली गेली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, GPRS/एज, वायफाय 802.11 B/G/N, मायक्रो-USB आणि ब्लूटुथ फीचर दिले गेले आहे. ह्याचे परिमाण 154×78.7×8.9mm आहे. आणि ह्याचा काळ्या रंगातील स्मार्टफोन लिस्ट केला आहे. स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसरसह येईल.
तिथेच जर मायक्रोमॅक्स कॅनवास अमेज (Q395) बद्दल बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्यात 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6580 प्रोसेसर आणि २जीबीचे रॅम दिले गेले आहे. ह्यात ८जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला ३२ जीबीपर्यंत वाढवू शकता.