मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास मेगा 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे आणि कंपनीने ह्याची किंमत ७,९९९ रुपये ठेवली आहे. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात 6 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ह्याच्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 540×960 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसमध्ये 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
मायक्रोमॅक्स कॅनवास मेगा 2 च्या इतर फीचरवर नजर टाकली तर, आपल्याला कळेल की, ह्यात 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर दिले गेले आहे. ह्यात 1GB ची रॅमसुद्धा देण्यात आली आहे. हा 8GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ह्याच्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हा रियर कॅमेरा ऑटोफोकसने सुसज्ज आहे. ह्यात LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
हेदेखील पाहा- लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या फोनमध्ये 4G LTE, वायफाय, ब्लूटुथ, मायक्रो-USB, GPRS/EDGE, GPS आणि 3G चे फीचर्स दिले गेले आहे. हा फोन अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो.
हेदेखील वाचा – “Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी