मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास फँटाबुलेट लाँच केला आहे. मायक्रोमॅक्सने ह्या स्मार्टफोनला मध्यम रेंजच्या श्रेणीत आणले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत ७,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आपण फ्लिपकार्टच्या माध्यमातून क्रोम गोल्ड रंगातला हा स्मार्टफोन घेऊ शकता.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याला ६.९८ इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात आणले आहे. त्याच्या ह्या किंमतीमुळे तसेच त्याच्या उत्कृष्ट स्क्रीनमुळे हा स्मार्टफोन लेनोवोच्या फॅब प्लसला कडक टक्कर देणार आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची डिस्प्ले दिली आहे. ह्याची किंमत २०,९९० रुपयाच्या जवळपास आहे आणि ऑक्टोबरमध्ये भारतात लाँच केला गेला होता.
मायक्रोमॅक्सच्या ह्या फँटाबुलेट स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६.९८ इंचाची HD 720×1280 पिक्सेलची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 1GB चे रॅम दिले गेले आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.
अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालणा-या ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सेलचा रियर ऑटोफोकस कॅमेरा LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 2 मेगापिक्सेलचा फिक्स्ड फोकस कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ड्यूल-सिम सपोर्ट करणा-या ह्या फँटाबुलेटमध्ये 3000mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.
त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये आपल्याला किंडल, सावन आणि गाना इत्यादींसारखे काही खास अॅप्स आधीच दिले गेले आहेत. तसेच आपल्याला ड्यूल-बॉक्स स्पीकर मिळत आहे जो DTS तंत्रज्ञानाने बनलेला आहे. मायक्रोमॅक्स ह्या फोनसह ९० दिवसांसाठी सावन प्रो चे मोफत सब्सक्रिप्शनसुद्धा देत आहे.