मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्सने आपला नवीन स्मार्टफोन कॅनवास 5 लाँच केला आहे. कंपनीने ह्या नवीन स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये ठेवली आहे. कॅनवास 5 स्मार्टने २०१३मध्ये लाँच केल्या गेलेल्या कॅनवास ४ चे अपग्रेडेड व्हर्जन आहे.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.२ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले २.५ कर्व्ड टच पॅनलने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ चे प्रोटेक्शनसुद्धा दिले गेले आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT6753 प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. ग्राफिक्ससाठी ह्यात mali-T720 MP2 GPU सुद्धा आहे.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह १३ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन 2900mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
कॅनवास 4 च्या तुलनेत मायक्रोमॅक्स कॅनवास 5 पॉवरफुल प्रोसेसर, जास्त रॅम, उत्कृष्ट डिस्प्ले आणि मोठी बॅटरी दिली गेली आहे. फ्रंट आणि रियर कॅमे-याच्या सेंसरमध्ये काही विशेष बदल केले गेले नाही. हँडसेटमध्ये फोटो प्रोसेसिंग तंत्रज्ञानाला अजून चांगले बनवले आहे आणि अनेक कॅमेरा वैशिष्ट्यसुद्धा समाविष्ट केली आहेत,
मायक्रोमॅक्स कॅनवास 5 एक ड्युल सिम डिवाईस (GSM+GSM) आहे जो आऊट ऑफ बॉक्स अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय, GPRS/एज, GPS/A-GPS, मायक्रो-USB, ब्लूटुथ आणि 4G LTE देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये एंबियंट लाइट सेंसर, ग्रेव्हिटी सेंसर, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिले गेले आहे.