मायक्रोमॅक्स कॅनवास 5 लाइट स्पेशल एडिशन स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे. आता ह्या स्मार्टफोनला कंपनीने अधिकृतरित्या लाँच केले आहे. तथापि कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धतेविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
ह्या आधी आलेल्या रिपोर्टनुसार, ह्या स्मार्टफोनची किंमत १०,००० रुपये असू शकते आणि हा ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
हेदेखील पाहा – [Marathi] LeEco Super 3 TVs – LeEco सुपर 3 टीव्ही फर्स्ट लूक
ह्या लिस्टिंगनुसार, कॅनवास 5 लाइट स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. हा 1GHz क्वाड-कोर (MTK6735P) प्रोसेसर, 3GB रॅम आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
हेदेखील वाचा – ५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…
हा स्मार्टफोन 2000mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि हा 4.5 तासांचा टॉकटाईम आणि 150 तासांचा स्टँडबाय टाईम देऊ शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये 8MP चा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE, GPS, ब्लूटुथ, वायफाय आणि मायक्रो-USB पोर्ट दिले आहेत.
हेदेखील वाचा – BSNL ने आपल्या लँडलाइन यूजर्ससाठी केली मोफत अनलिमिटेड कॉलिंगची घोषणा
हेदेखील वाचा – सॅमसंगने भारतात लाँच केला गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन, किंमत ५९,९९० रुपये