Micromax ने लॉन्च केला Bharat 5 Pro स्मार्टफोन, Xiaomi Redmi 5 ला देईल टक्कर
Micromax ने Bharat सीरीज मध्ये आपला नवीन स्मार्टफोन ला Micromax Bharat 5 pro नावाने लॉन्च केला आहे. या स्मार्टफोन ची किंमत Rs. 7,999 आहे. याची सरळ टक्कर Xiaomi Redmi 5 शी होणार आहे.
भारतात Xiaomi Redmi 5 स्मार्टफोन च्या लॉन्च झाल्यानंतर काही वेळाने Micromax ने आपल्या Micromax Bharat 5 pro स्मार्टफोन ला लॉन्च केले आहे. या स्मार्टफोन ची किंमत Rs. 7,999 आहे. किंमती बद्दल अजुन बोलायाचे झाले तर या दोन्ही स्मार्टफोंस ची किंमत एक सारखी आहे. विशेष म्हणजे Xiaomi Redmi 5 च्या बेस वेरिएंट ची किंमत हीच आहे.
तसेच Redmi 5 च्या भारतातील लॉन्च नंतर समोर आलेल्या Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन ची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची 5000mAh क्षमता असलेली बॅटरी, ही बॅटरी तुम्हाला रिवर्स चार्जिंग फीचर सह मिळते. याचा अर्थ असा की तुम्ही या स्मार्टफोन ला एका पॉवर बँक प्रमाणे वापरु शकता.
याव्यतिरिक्त या स्मार्टफोन ची अजून एक खास बात ही आहे की या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 3GB चा रॅम मिळत आहे, पण जर Redmi 5 स्मार्टफोन बद्दल बोलायाचे झाले तर यात तुम्हाला फक्त 2GB चा रॅम मिळत आहे. आणि जरी दोघांची किंमत एक असली तरी या बाबतीत Micromax Bharat 5 Pro स्मार्टफोन पुढे निघून जातो. तसेच याच्या इतर फीचर्स बद्दल बोलायाचे झाले तर यात तुम्हाला एक फेस अनलॉक फीचर, आणि फ्रंट कॅमेरा सह एक LED फ्लॅश मोड्यूल पण मिळत आहे.
स्मार्टफोन च्या अन्य स्पेक्स पाहता यात तुम्हाला एंड्राइड नौगट चा सपोर्ट मिळत आहे तसेच या मध्ये तुम्हाला एक 5.2-इंचाचा HD 720×1280 पिक्सेल रेजोल्यूशन चा डिस्प्ले मिळणार आहे याव्यतिरिक्त फोन मध्ये एक 1.3GHz चा क्वाड-कोर प्रोसेसर एक 3GB ची DDR3 रॅम पण मिळत आहे. स्मार्टफोन मध्ये एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह आणि एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण LED फ्लॅश सह तुम्हाला मिळेल.
माइक्रोमॅक्स भारत 5 प्रो स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 32GB ची इंटरनल स्टोरेज पण मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. सोबत फोन मध्ये 4G VoLTE, Wi-Fi, USB OTG आणि अन्य काही फीचर मिळत आहेत. फोन मध्ये एक 5000mAh क्षमता असलेली एक बॅटरी पण मिळत आहे.