भारतीय मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स जगातील टॉप 10 स्मार्टफोन निर्माता कंपनीच्या यादीत सामील झाली आहे. जुलै ते सप्टेंबर २०१५ पर्यंत मायक्रोमॅक्सची जागतिक मोबाईल फोन शिपमेंटची विक्री 478 मिलियन यूनिटपर्यंत पोहोचली आहे.
गार्टनर रिपोर्टनुसार टॉप १० स्मार्टफोन निर्मात्यांच्या यादीत मायक्रोमॅक्सचा समावेश झाला आहे अशी माहिती गार्टनरद्वारा जारी करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान कंपनीने १२.१६ मिलियन यूनिट सेल केली आहे. तर मागील वर्षी ह्याचवेळी कंपनीने केवळ ५.६ मिलियन यूनिट सेल केली होती. याचाच अर्थ हे मागील वर्षीपेक्षा दुप्पटीनेही अधिक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंग ह्या यादीत पहिल्या स्थानावर आहे, सॅमसंग मागील वर्षीही पहिल्या स्थानावरच होती. सॅमसंगच्या उत्पन्नात ह्या वर्षी मागील वर्षी पेक्षा ९ टक्के जास्त वाढ झाली आहे. ह्या तीन महिन्यात सॅमसंगने १०२ मिलियन यूनिट सेल केले आहेत. त्याशिवाय अॅप्पलने ह्या वर्षी ४६ मिलियन डिवाइस सेल करुन २०.६ टक्के उत्पन्नात वाढ केली आहे.
गार्टनर रिपोर्ट अनुसार, टॉप १० स्मार्टफोन निर्मात्यांच्या लिस्टमध्ये मायक्रोमॅक्स, सॅमसंग आणि अॅप्पल व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट, हुआवे, एलजी, लेनोवो आणि श्याओमी यांचा समावेश आहे.