मे सिक्योरिटी पॅच सह Mi A1 ला मिळणार नाही एंड्राइड 8.1 ओरियो अपडेट

Updated on 28-May-2018
HIGHLIGHTS

इतर एंड्राइड वन फोन्स म्हणजे Nokia 7 Plus आणि Nokia 6 (2018) ला आधीच अपडेट मिळाला आहे.

Xiaomi ने आपल्या Mi A1 स्मार्टफोन साठी मे 2018 सिक्योरिटी पॅच जारी केला आहे. भारतीय यूजर्सना हा 80.1MB OTA अपडेट मिळायला सुरवात झाली आहे आणि लवकरच इतर देशांमध्ये पण हा अपडेट जारी केला जाईल. इतर एंड्राइड वन फोन्स म्हणजे Nokia 7 Plus आणि Nokia 6 (2018) ला आधीच अपडेट मिळाला आहे. Mi A1 यूजर्स साठी एक निराशाजनक बाब ही आहे की या अपडेट मध्ये एंड्राइड 8.1 ओरियो अपडेट चा समावेश करण्यात आला नाही. 
Xiaomi Mi A1 यूजर्स उत्सुकतेने एंड्राइड ओरियो अपडेट ची वाट बघत आहेत. ही उत्सुकता Mi कम्युनिटी आणि ऑनलाइन फोरम्स मधून दिसून येते. मागच्या महिन्यात हा डिवाइस एंड्राइड ओरियो च्या बीटा बिल्ड सह इन्टरनेट वर दिसला होता त्यामुळे आशा होती की हा अपडेट मे सिक्योरिटी पॅच सह जारी केला जाईल. पण, लेटेस्ट एंड्राइड अपडेट ने अपेक्षा भंग केल्या आहेत. 

Xiaomi Mi A1 यूजर्स व्यतिरिक्त भारतीय Moto X4 यूजर्स पण एंड्राइड 8.1 ओरियो अपडेट ची वाट बघत आहेत कारण अनेक देशांमध्ये Motorola ने Moto X4 च्या एंड्राइड वर्जन साठी अपडेट जारी केला आहे.

Xiaomi Mi A1 मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च केला गेला होता. Xiaomi Mi A1 मध्ये क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 4GB चा रॅम आहे. तसेच यात 64GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. यात 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 2.5D कर्व्ड ग्लास सह येतो. यात रियर पॅनल वर एक फिंगर प्रिंट सेंसर पण आहे. 

Xiaomi Mi A1 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप पण आहे. दोन्ही कॅमेरा 12MP चे आहेत. एक टेलीफोटो लेंस आहे आणि दूसरी वाइड-एंगल लेंस आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :