Meizu चा एंड्राइड Go स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटी होऊ लॉन्च

Meizu चा एंड्राइड Go स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटी होऊ लॉन्च
HIGHLIGHTS

Meizu चा आगामी स्मार्टफोन स्टॉक एंड्राइड वर्जन सह येऊ शकतो.

गूगल च्या एंड्राइड गो प्रोग्राम मध्ये आपण अनेक स्मार्टफोन कंपन्या बघितल्या आहेत आणि आता या यादीत Meizu पण सामिल होणार आहे. या यादीत आधीपासून अल्काटेल, नोकिया आणि ZTE अशा कंपन्या आहेत. पण आता एक नवीन माहिती कंपनी च्या मार्केटिंग हेड ने एका ट्विट मधुन दिली आहे. त्यानुसार, कंपनी आपला नवीन स्मार्टफोन एंड्राइड गो सह लॉन्च करू शकते. 
या ट्विट मध्ये लिहिले आहे , “Those of you who’ve been following me for a while know how passionate I am about Android Go।” त्याचबरोबर ते पुढे लिहतात की, “I’m proud to share we’re working together with Google to launch Meizu’s first #AndroidGoEdition smartphone!”
या ब्रँड चा US मध्ये इतका प्रभाव नाही पण यूरोप आणि आशिया च्या बाजारात या ब्रँड ची चांगली पकड आहे आणि याला इथे चांगले यश देखील मिळाले आहे. हे पाहता असे दिसत आहे की कंपनी US मध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी काम करणार आहे. कारण हुवावे आणि ZTE सारख्या चीनी कंपन्या पण इथे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पोचल्या आहेत. 
काही दिवसांपूर्वी कंपनी ने आपली Meizu 15 सीरीज लॉन्च केली आहे. या सर्व फोंस मध्ये कंपनी ने सुपर AMOLED स्क्रीन दिली आहे, जी 16:9 आस्पेक्ट रेश्यो सह समोर आली आहे. एकीकडे ट्रेंड 18:9 डिस्प्ले चा आहे आणि 19:9 आस्पेक्ट रेश्यो सह पण फोन लॉन्च झाले आहेत, तर दुसरीकडे Meizu ने आपले हे तीन नवीन स्मार्टफोंस 16:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केले आहेत. पण कंपनी हे डिवाइस भारतात लवकर लॉन्च नाही करणार. 
Meizu 15 Plus स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस कंपनी ने सॅमसंग च्या Exynos 8895 प्रोसेसर सह लॉन्च केला आहे, पण इतर दोन डिवाइस स्नॅपड्रॅगन च्या मिड-रेंज प्रोसेसर सह लॉन्च झाले आहेत. Meizu 15 पाहता यात स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळेल, तर Lite वर्जन स्नॅपड्रॅगन 626 चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo