डुअल डिस्प्ले असलेला Meizu Pro 7 झाला भारतात लॉन्च, Amazon वर उपलब्ध

Updated on 04-Apr-2018
HIGHLIGHTS

Meizu Pro 7 ब्लॅक रंगाच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे आणि हा ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून 22,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो.

Meizu Pro 7 स्मार्टफोन भारतता लॉन्च झाला आहे. मागच्या वर्षी जुलै मध्ये Meizu ने चीन मध्ये दोन स्मार्टफोंस Pro 7 आणि Pro 7 Plus लॉन्च केले होते. या दोन्ही स्मार्टफोंस ची सर्वात खास बाब म्हणजे यात असलेला सेकेंडरी डिस्प्ले जो एक सुपर AMOLED पॅनल आहे. Meizu Pro 7 स्मार्टफोन 2017 च्या शेवटपर्यंत भारतात लॉन्च केला जाणार होता पण काही लॉजिस्टिक्स च्या समस्यांमुळे हा डिवाइस लॉन्च होऊ शकला नाही पण आता भारतात हा स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. 

Meizu Pro 7 स्मार्टफोन 22,999 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे हा स्मार्टफोन विशेष करून Amazon वर उपलब्ध आहे. Meizu Pro 7 Plus पण ऑनलाइन रिटेलर वेबसाइट वर लिस्टेड दिसला. पण अजून पर्यंत हे स्पष्ट झाले नाही की हा भारतात अधिकृत पणे कधी लॉन्च केला जाईल. अजून पर्यंत कंपनी ने या फोन च्या लॉन्च बद्दल काहीही सांगितले नाही. 

Meizu Pro 7 च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Meizu Pro 7 च्या फ्रंटला 5.2 इंचाचा FHD सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे आणि डिवाइस च्या रियर ला 2 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. सेकेंडरी डिस्प्ले चा वापर मेसेजेस च्या नोटिफिकेशन, कॉल्स आणि वेदर अपडेट साठी केला जाऊ शकतो आणि सोबतच रियर कॅमेरा ने सेल्फी घेण्यासाठी पण सेकेंडरी डिस्प्ले उपयोगी ठरेल. 
Meizu Pro 7 मध्ये मीडियाटेक हेलिओ P25 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. चीन मध्ये या डिवाइसला दोन स्टोरेज वेरिएंट 64GB आणि 128GB मध्ये लॉन्च केले गेले होते. हा स्मार्टफोन एंड्राइड 7.0 नौगट सह मिळून कंपनी च्या Flyme 6 OS वर चालतो. 

ऑप्टिक्स पाहता, तो हा स्मार्टफोन डुअल रियर कॅमेरा सेटअप सह येतो ज्यात दोन 12MP चा Sony IMX386 सेंसर आहे. ज्यातील एक RGB आणि दूसरा मोनोक्रोम सेंसर आहे आणि कॅमेरा सेटअप सह LED फ्लॅश पण आहे. सेल्फी साठी डिवाइस च्या फ्रंट ला 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. Meizu Pro 7 मध्ये असलेली 3000mAh ची बॅटरी mCharge 3.0 फास्ट चार्जिंग फीचर सह येते. 

डिवाइस च्या फ्रंटला होम बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर एम्बेड करण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी हा स्मार्टफोन 4G VoLTE, ब्लूटूथ 4.2, GPS, Wi-Fi आणि एक माइक्रो USB 2.0 पोर्ट ऑफर करतो. हा डिवाइस ब्लॅक रंगाच्या ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे आणि हा ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून 22,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :