मिजू प्रो 5 मिनीला मिडियाटेक हेलियो एक्स20 चिपसेटवर सादर केला जाऊ शकतो. ज्यात 10 कोरचा चिपसेट असेल.
मोबाईल निर्माता कंपनी मिजू लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन प्रो ५ मिनी लाँच करु शकतो. सध्यातरी अशी माहिती मिळत आहे की, हा स्मार्टफोन मिडियाटेक हेलियो एक्स20 चिपसेटने सुसज्ज आहे. हल्लीच लाँच केलेल्या मिजू प्रो ५चा हा अपडेटेट व्हर्जन असल्याचे सांगितले जातय.
फोनरेडोरवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मिजू प्रो 5 मिनीला मिडियाटेक हेलियो एक्स 20 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. ज्यात 10 कोरचा चिपसेट असेल. मात्र सध्यातरी कंपनीने मिजू प्रो 5 मिनीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हा फोन ३२जीबी आणि ६४ जीबी मॉडलमध्ये उपलब्ध होईल. मिळालेल्या माहितीनुसार, मिजू प्रो 5 मिनीच्या ३२जीबीची किंमत CNY 1,999(जवळपास २०,७०० रुपये) आणि ६४जीबीची किंमत CNY 2,499(जवळपास २६,००० रुपये) असू शकते.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, मिजू प्रो 5 मिनी स्मार्टफोनमध्ये ४.७ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले असू शकते. ह्यात २१.१ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा असू शकतो. हा ५.१ लॉलीपॉप अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. ह्यात 3,050mAh ची बॅटरीसुद्धा असू शकते.