काही नवीन अफवांवरुन असे सांगण्यात येतय की, मिजू MX6 स्मार्टफोन १९ जुलैला लाँच केला जाईल. १९ जुलैला बीजिंगमध्ये एका पत्रकार परिषदेत हा स्मार्टफोन लाँच केला जाऊ शकतो. अलीकडेच आलेल्या काही लीक्सनुसार हा स्मार्टफोन मेटल बॉडीने सुसज्ज असेल, असे समोर आले आहे.
त्याशिवाय ह्यात आपल्याला 1080p स्क्रीन रिझोल्युशन 2.5D ग्लासने सुसज्ज असलेली डिस्प्ले असू शकत. ह्यात आपल्याला हेलिओ X20 चिपसेट असेल.
हा दोन वेरियंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. ह्यात 3GB रॅम व्हर्जनसह 32GB चे स्टोरेज मिळेल, तर 4GB व्हर्जनमध्ये 64GB चे स्टोरेज मिळेल.
हेदेखील वाचा – जुलै २०१६ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन्स
त्याशिवाय ह्यात आपल्याला 20/7MP चा कॅमेरा सेटअप मिळत आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे आणि ह्या स्मार्टफोनची किंमत CNY 1,800 असेल.
हेदेखील वाचा – जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…
हेेदेखील वाचा – 4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच