ह्यात 3GB ची रॅमसुद्धा दिली आहे. हा स्मार्टफोन 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी मिजूने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन M3E लाँच केला. ह्या नवीन फोनमध्ये 5.5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली आहे. हा मिडियाटेक MT6755 हेलिओ P10 प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 3GB ची रॅमसुद्धा दिली आहे. हा स्मार्टफोन 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते.
त्याशिवाय ह्या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. ह्या फोनचा आकार 153.6×75.8×7.9mm आहे आणि ह्याचे वजन 172 ग्राम आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 3100mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या फोनमध्ये फास्ट चार्जिंग फीचरसुद्धा आहे. हा ब्लू, ग्रे, सिल्वर, गोल्ड आणि रोझ गोल्ड रंगात मिळेल. ह्याची किंमत CNY 1299 (195 डॉलर) पासून सुरु आहे.