अलीकडेच ह्या स्मार्टफोनला लाँच केले गेले होते आणि आता हा स्मार्टफोन स्नॅपडिलच्या माध्यमातून विकला जात आहे. जर तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज स्नॅपडीलच्या माध्यमातून खरेदी करणे नक्कीच तुमच्या फायद्याचे आहे.
मिजूने ह्या स्मार्टफोनच्या चौथ्या सेलची घोषणा केली आणि सांगितले की , ह्याआधीही ह्या स्मार्टफोनला ओपन सेलमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. सकाळी ११ वाजल्यापासून स्नॅपडीलवर ह्याची विक्री सुरु झाली आहे. त्यासाठी आपल्याला कोणतेही रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही. कंपनीने भारतातील ३३ शहरांमध्ये ४६ कस्टमर सर्विसेस सेंटर जोडले आहेत.
ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये CNY 599 (जवळपास ६,२०० रुपये) यात लाँच केले होते. ह्या स्मार्टफोनला भारतातही ह्याच किंमतीत लाँच केले जाईल. ह्या स्मार्टफोनला भारतात आधीच असलेले रेडमी 2 आणि मोटोरोला मोटो E जेन 2 जबरदस्त स्पर्धा करणार आहेत.
स्मार्टफोनच्या तपशीलाबाबत बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD (720×1280 पिक्सेल) रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे, ज्यात AGC ड्रॅगनटेल प्रोटेक्टिव ग्लासने सुरक्षित करण्यात आले आहे. त्याची पिक्सेल तीव्रता 296ppi आहे आणि स्मार्टफोनमध्ये 64 बिट क्वाडकोर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.3GHz स्पीड देतो. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 2GB ची LPDDR3 रॅम आणि Mali T720 GPU सुद्धा मिळत आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा f/2.2 अॅपर्चर आणि कॉर्निंग गोरिला ग्लास ३ने सुरक्षित करण्यात आले आहे आणि LED फ्लॅशसुद्धा दिली गेली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला आहे, जो आपल्याला f/2.0 अॅपर्चरसह फोटोनेशन 2.0 स्मार्टफोन सेल्फी आणि फेस AE फेस लाइट बुुस्ट फंक्शनलिटीसह येतो. स्मार्टफोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवू शकतो.