१६ मेगापिक्सेलने सुसज्ज असलेला मिजू MX5E स्मार्टफोन ऑनलाइन साइटवर लिस्ट

Updated on 05-Apr-2016
HIGHLIGHTS

हा फोन 2GHz मिडियाटेक 64 बिट MT6795 हेलियो X10 ऑक्टाकोर प्रोेसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी PowerVR G6200 GPU दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.

मोबाईल निर्माता कंपनी मिजूचा नवीन फोन MX5E ऑनलाइन लिस्ट केला गेला आहे. मिजू MX5E  स्मार्टफोनला सध्यातरी रिटेल स्टोरवर 1,399 चीनी युआन (जवळपास १४,३०१ रुपये) मध्ये लिस्ट केले गेले आहे. तथापि, आतापर्यंत ह्या फोनला कंपनीने अधिकृतरित्या लाँच केला गेला नाही. हा स्मार्टफोन मागील वर्षी लाँच झालेल्या MX5 चा नवीन प्रकार असल्याचे सांगितले जातय.

 

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD सुपर AMOLED डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. ही डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लासने सुरक्षित आहे. स्क्रीनची पिक्सेल तीव्रता 441ppi आहे. हा फोन 2GHz मिडियाटेक 64 बिट MT6795 हेलियो X10 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि 3GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये ग्राफिक्ससाठी PowerVR G6200 GPU दिला गेला आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा मिळत आहे.

 

मिजू MX5E स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. डिवाइसमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. फोनमध्ये फिजिकल होम बटन फिंगरप्रिंट स्कॅनरप्रमाणे काम करेल. फोनमध्ये 3150mAh ची बॅटरी दिली गेली आहे, जो क्विक चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.0 लॉलॉपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा एक ड्यूल सिम डिवाइस आहे आणि दोन्हीही सिम 4G ला सपोर्ट करतात.

 

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPS/AGPS. ग्लोनास आणि मायक्रो-USB सपोर्ट आहे. ह्या डिवाइसमध्ये ग्रेव्हिटी सेंसर, IR प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप, एंबियंट लाइट सेंसर आणि डिजिटल कंपाससुद्धा आहेत.

हेदेखील वाचा – वनप्लस X च्या किंमतीत झाली मोठी घट

हेदेखील वाचा – ह्या अॅप्सच्या माध्यमातून भारतातील प्रेक्षणीय स्थळांना द्या भेट

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :