Meizu ने रशिया मध्ये आपला एक नवीन डिवाइस लॉन्च केला आहे, हा डिवाइस कंपनी ने Meizu M8c नावाने लॉन्च केला आहे, हा डिवाइस मागच्या वर्षी मे मध्ये लॉन्च झालेल्या Meizu M5c च्या पीढीचा नवीन डिवाइस च्या रुपात लॉन्च केला गेला आहे.
Meizu चा नवीन डिवाइस बाजारातील काही ट्रेंड बघून त्या सह लॉन्च करण्यात आले आहे, हा डिवाइस 18:9 आस्पेक्ट रेश्यो सह लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर यात एक फेस अनलॉक फीचर पण आहे. पण यात फिंगरप्रिंट सेंसर ठेवण्यात आला नाही.
Meizu M8c स्मार्टफोन रशियात RUB 9,990 म्हणजे जवळपास Rs 11,000 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे, याव्यतिरिक्त हा डिवाइस काही कलर ऑप्शन्स मध्ये घेतला जाऊ शकतो. हा डिवाइस तुम्ही रेड, गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक इत्यादी रंगामध्ये विकत घेऊ शकता. पण अजून Meizu कडून अशी काहीच माहिती मिळाली नाही की हा डिवाइस या देशा व्यतिरिक्त भारता सह इतर काही देशांमध्ये लॉन्च केला जाईल की नाही.
या डिवाइस च्या स्पेक्स आणि फीचर्स पाहता हा डिवाइस कंपनी ने 5.45-इंचाचा HD+ डिस्प्ले 1440×720 पिक्सल 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या स्क्रीन सह सादर केला आहे. या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट आहे, याव्यतिरिक्त यात 2GB चा रॅम तसेच 16GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे. ही स्टोरेज तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.
फोटोग्राफी साठी फोन मध्ये तुम्हाला एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे, तसेच यात एक 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण आहे. फोन मध्ये एक 3,070mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन्स मध्ये तुम्हाला 4G LTE सपोर्ट मिळत आहे, तसेच यात तुम्हाला वाई-फाई 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 4.1 आणि GPS पण मिळत आहे.