Meizu E3 कंपनी ने सादर केलेला नवीन डिवाइस आहे जो सध्यातरी फक्त चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. या स्मार्टफोन मध्ये काही टॉप-एंड स्पेक्स बघायला मिळत आहेत. पण याची किंमत पाहता असे बोलू शकतो की याचे हे फीचर्स खुप चांगले आहेत. स्मार्टफोन ची विशेषता ही आहे की हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. तसेच यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 6GB चा रॅम देण्यात आला आहे, तसेच या फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे.
हा स्मार्टफोन चीन मध्ये 26 मार्च पासून प्री-आर्डर केला जाऊ शकतो आणि याची शिपिंग 31 मार्च पासून सुरू होईल. स्मार्टफोन वेगवेगळ्या तीन कलर वेरिएंटस जसे शॅम्पेन गोल्ड, ब्लॅक आणि ब्लू रंगात सादर केला गेला आहे.
स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायाचे झाले तर स्मार्टफोन मध्ये एक 5.99-इंचाचा FHD+ 1080×2160 पिक्सल रेजोल्यूशन वाला डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन एंड्राइड 7.2.1 नौगट सह सादर करण्यात आला आहे आणि यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर सह 6GB ची रॅम पण आहे.
स्मार्टफोन मधील कॅमेरा पाहता यात एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळत आहे. याचे सेंसर बघितले तर यात एक 12-मेगापिक्सल चा Sony IMX362 सेंसर मिळत आहे, याव्यतिरिक्त यात दूसरा सेंसर एक 20-मेगापिक्सल चा Sony IMX350 आहे. या दोन्ही कॅमेरा सोबत तुम्ही खुप चांगले फोटो घेऊ शकता. सोबतच तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये एक 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे.
फोन मध्ये तुम्हाला 64GB आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे, जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड च्या मदतीने 128GB पर्यंत वाढवू शकतो. डिवाइस मध्ये तुम्हाला एक 3360mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.
याची किंमती बद्दल बोलायचे झाले हा डिवाइस तुम्हाला 64GB वेरिएंट मध्ये CNY 1,799 म्हणजे जवळपास Rs 18,500 च्या किंमतीत मिळेल, याव्यतिरिक्त जर तुम्ही याचा 128GB वेरिएंट घेऊ इच्छित असाल तर यासाठी CNY 1,999 म्हणजे जवळपास Rs 20,600 खर्च करावे लागतील. इथे विशेष म्हणजे कंपनी ने या डिवाइस सोबत एक लिमिटेड एडिशन Meizu E3 J-20 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे, ज्याची किंमत CNY 2,499 म्हणजे जवळपास Rs 25,700 आहे.