MEIZU 16XS फोन 6.2-इंचाची FHD+ AMOLED स्क्रीन, ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह दिसला इंटरनेट वर
तुम्हाला तर माहितीच आहे कि Meizu 16Xs मोबाईल फोन बद्दल आधी पण अनेकदा माहिती समोर आली आहे पण यावेळी या स्मार्टफोनच्या काही स्पेक्सची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा मोबाईल फोन इंटरनेट वर 2GHz प्रोसेसर सह दिसला आहे. असे बोलले जात आहे कि हा मोबाईल फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो.
या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 6.2-इंचाची 1080×2232 पिक्सलची FHD+ 18.5:9 आस्पेक्ट रेश्यो असलेली सुपर AMOLED स्क्रीन मिळणार आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 2GHz चा ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळत आहे. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एड्रेनो 612 GPU पण मिळत आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला 6GB चा LPDDR4x रॅम मिळत आहे. तसेच हा मोबाईल फोन 64GB स्टोरेज आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ड्यूल सिम सपोर्ट पण मिळत आहे.
स्मार्टफोन एंड्राइड 9.0 पाई सोबत फ्लाईमी OS वर चालतो. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 48MP चा रियर कॅमेरा मिळणार आहे, जो LED फ्लॅश सह येईल. यात एक Sony IMX586 सेंसर मिळत आहे, त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा पण मिळत आहे. याव्यतिरिक्त यात तुम्हाला एक 5MP चा कॅमेरा पण मिळत आहे. हे तिन्ही मिळून तुम्हाला यात एक triple कमेरा सेटअप मिळेल. सोबतच फोन मध्ये तुम्हाला एक 16MP चा फ्रंट कॅमेरा पण मिळत आहे.
या मोबाईल फोन मध्ये इत्तर काही फीचर्स बद्दल बोलायचे तर या मोबाईल फोन मध्ये एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. तसेच या मोबाईल फोन मधील कनेक्टिविटी ऑप्शन्स पाहता यात तुम्हाला ड्यूल 4G VoLTE, वाई-फाई 802.11 ac मिळतो. तसेच फोन मध्ये तुम्हाला MIMO सपोर्ट पण मिळतो. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला ब्लूटूथ 5 चा सपोर्ट पण मिळेल. तसेच यात GPS, USB Type C पण आहे. त्याचबरोबर या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 4000mAh क्षमता असलेली बॅटरी मिळणार आहे, पण कदाचित यात तुम्हाला एक 3900mAh क्षमता असेल बॅटरी पण मिळू शकते. जी तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात येईल.