Meizu 16 स्मार्टफोन मध्ये प्रेशर सेंसिटिव बटन सोबत असेल mBack जेस्चर
Meizu 16 स्मार्टफोन मध्ये हा प्रेशर सेंसिटिव बटन सरळ मिजू mBack जेस्चर्स शी इन्कोर्पोरेट असेल.
Meizu 16 to Launch with Pressure Sensitive Home Button with mBack Gesture: Meizu आपल्या Meizu 16 स्मार्टफोन बद्दल खुप उत्सुक आहे, याबद्दल कंपनी ने खुप हाइप पण केली आहे, असे बोलले जात आहे की हा डिवाइस कंपनी कडून ऑगस्ट मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मागच्या काही महिन्यांमध्ये कंपनी चे फाउंडर Jack Wong ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोंस चे फीचर्स एका नंतर एक असे सादर केले आहेत.
आता याची पण माहिती मिळाली आहे की हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त यात एक फुल स्क्रीन डिस्प्ले पण असेल. आता कंपनी च्या फाउंडर ने एक नवीन फीचर समोर ठेवला आहे, असे समोर येत आहे की या स्मार्टफोन चा होम बटन प्रेशर सेंसिटिव असेल. जसा आपण मागच्या वर्षी सॅमसंग गॅलेक्सी S8 स्मार्टफोन मध्ये बघितला आहे.
या फीचर बद्दल जास्त माहिती चीनी वेबसाइट My Drivers च्या माध्यामातून समोर आली आहे. या माहिती वरून समोर येत आहे की या डिवाइस मध्ये तुम्हाला एक प्रेशर सेंसिटिव होम बटन मिळेल, जो मिजू च्या mBack जेस्चर सोबत इन्कॉर्पोरेट होणार आहे. यात तुम्हाला खुप सिंपल फंक्शनलिटी मिळेल. तसेच होम बटन वर एक सिंपल टॅप केल्यास तुम्ही पुन्हा एकदा अॅप्लीकेशन वर जाल. तसेच तुम्हाला फोन च्या होम बटन वर राईट आणि लेफ्ट जेस्चर पण मिळत आहेत, जे तुम्हाला खुप उपयोगी पडतील. हा फीचर सर्वात आधी Meizu च्या अफोर्डेबल स्मार्टफोन Meizu M6S मध्ये दिसला होता.
रुमर्स वर लक्ष्य दिल्यास हा डिवाइस दोन वेगवेगळ्या वेरिएंट्स म्हणजे Meizu 16 आणि Meizu 16 Plus मध्ये लॉन्च kela जाणार आहे. हे स्मार्टफोंस क्रमश: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च केला जाऊ शकतो. असे पण समोर येत आहे की पहिला वेरिएंट म्हणजे Meizu 16 तुम्हाला 6GB च्या रॅम आणि दोन स्टोरेज वैरिएंट म्हणजे 64GB आणि 128GB मध्ये मिळणार आहे, तसेच Meizu 16 Plus तुम्हाला 8GGB च्या रॅम सह 128GB आणि 256GB स्टोरेज मध्ये मिळू शकतो.
हे दोन्ही स्मार्टफोंस फुल स्क्रीन नाॅच-लेस डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो. या स्मार्टफोंस मध्ये क्रमश: 5.6-इंचाचा आणि 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले असेल. याव्यतिरिक्त छोट्या वेरिएंट मध्ये तुम्हाला एक 3,080mAh क्षमता असलेली बॅटरी मिळणार आहे, तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये तुम्हाला एक 3,600mAh क्षमता असलेली बॅटरी मिळेल. पण ही माहिती समोर आली नाही की हे डिवाइस एंड्राइड Oreo वर लॉन्च केला जाईल, किंवा एंड्राइड नौगट सह हे स्मार्टफोंस लॉन्च केले जातील.
नोट: फीचर्ड इमेज Meizu 15 ची आहे!