फुल डिस्प्ले डिजाइन सह Meizu 15 एप्रिल मध्ये होऊ शकतो लॉन्च

Updated on 08-Mar-2018
HIGHLIGHTS

Meizu 15 मध्ये एक फुल स्क्रीन डिजाइन असू शकते.

अॅप्पल ने यावर्षी iPhone X ला नॉच डिजाइन सह सादर केले होते, त्यानंतर हा एक बाजारातील ट्रेंड बनात चालला आहे असे वाटत आहे. काही दिवसांपूर्वी Asus Zenfone 5 आणि Zenfone 5Z ला पण नॉच डिजाइन सह सादर करण्यात आले होते. अंदाज लावला जात आहे की Meizu 15 मध्ये पण ही नॉच डिजाइन असू शकते. हा कंपनी चा फ्लॅगशिप डिवाइस असेल. 

हि माहिती चीनी सोर्स Mocha RQ कडून आली आहे. त्यांच्या नुसार, हा एप्रिल मध्ये सादर होऊ शकतो, याला Meizu E2 च्या लॉन्च नंतर सादर केले जाऊ शकते. E2 या महिन्यात लॉन्च होऊ शकतो. Meizu 15 मध्ये एक फुल स्क्रीन डिजाइन असू शकते. या डिवाइस में 5.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले पण असू शकतो. 
पण या फोन मध्ये कोणता प्रोसेसर असेल, याबाबतीत अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळाली नाही. पण अंदाज लावला जात आहे की यात एक मीडियाटेक चिपसेट असू शकतो. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :