ह्या OTA अपडेटसाठी 874MB डाउनलोडची गरज आहे, त्याचबरोबर बिल्ट नंबर J500FXXU1BPF4 असले पाहिजे.
सॅमसंगने भारतात आपल्या गॅलेक्सी J5 (२०१५) ला अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोचे अपडेट देणे सुरु केले आहे. ह्या स्मार्टफोनला कंपनीने भारतात ११,९९९ रुपयाच्या किंमतीत मागील वर्षी लाँच केले होते.
हे नवीन अपडेट ह्या फोनला नवीन टचविज नवीन डिझाईनसह मिळेल. ह्या OTA अपडेटसाठी 874MB डाउनलोडची गरज आहे, त्याचबरोबर बिल्ट नंबर J500FXXU1BPF4 असले पाहिजे. जर तुम्हाला अजूनपर्यंत हे अपडेट मिळाले नसेल तर आपण स्वत: आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन हे तपासू शकता.
ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची HD (720p) डिस्प्ले दिली आहे, ह्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. ह्या फोनमध्ये 1.2GHz स्नॅपड्रॅगन 410 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1.5GB ची रॅम दिली आहे. हा 16GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2600mAh ची बॅटरी दिली गेली आहे.