LYF वॉटर 7 स्मार्टफोन लाँच, अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ने सुसज्ज

LYF वॉटर 7 स्मार्टफोन लाँच, अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ने सुसज्ज
HIGHLIGHTS

ह्या फोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर आणि 2GB रॅमसुद्धा आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

रिलायन्सने आपल्या LYF ब्रँडच्या अंतर्गत आपला नवीन फोन LYF वॉटर 7 लाँच केला आहे. ह्या फोनची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा फोन सिल्वर आणि सोनेरी रंगात उपलब्ध होईल. ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेले आहे.

ह्या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची FHD डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा ड्रॅगनटेल ग्लासने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 615 प्रोसेसर आणि 2GB रॅम देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवूही शकतो. त्याचबरोबर ह्या फोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आला आहे.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

तसेच ह्यात 3000mAh ची बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 14 तासांचा टॉकटाइम देईल. ह्यात 13 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. रियर कॅमे-यासह ह्यात LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्यात 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, 4G VoLTE, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्स दिले आहेत. ह्या फोनचा आकार 155.3×77.2×8.55mm आहे आणि वजन 160 ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा – शाओमी Mi5 आता अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल आणि टाटा क्लिकवर सुद्धा उपलब्ध
हेदेखील वाचा – 2GB रॅमने सुसज्ज आहे RDP थिन बुक लॅपटॉप लाँच, किंमत ९,९९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo