Lyf फ्लेम 6 स्मार्टफोन लाँच, 4G VoLTE सपोर्टने सुसज्ज

Lyf फ्लेम 6 स्मार्टफोन लाँच, 4G VoLTE सपोर्टने सुसज्ज
HIGHLIGHTS

हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर, माली 400MP2 PU आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज करण्यात आले आहे. फोनमध्ये 4GB अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, त्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

रिलायन्सचा रिटेल ब्रँड Lyf ने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन फ्लेम 6 लाँच केला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत ३,९९९ रुपये ठेवली आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला कंपनीच्या वेबसाइटवर अधिकृतरित्या लिस्ट केले गेले आहे. हा फोन रिलायन्स डिजिटल आणि डिजिटल एक्सप्रेस ऑफलाइन स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध होईल. हा काळ्या रंगात सुद्धा मिळेल.
 

ह्या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 218ppi आहे. हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोसेसर, माली 400 MP2 GPU आणि 512MB ची रॅमने सुसज्ज आहे. ह्या फोनमध्ये 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या वाढवूही शकतो.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. हा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह येतो. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतोय हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 4G सपोर्टसह लाँच केला गेला आहे. ह्या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4G, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB सारखे फीचर्स देण्यात आले आहे. ह्यात 1750mAh ची बॅटरीसुद्धा दिली गेली आहे. ह्याचा आकार 126x64x10.6mm आणि वजन 162 ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा – जगातील पहिला मॉड्यूलर फोन LG G5 झाला अखेर भारतात लाँच
हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी नोट 7 एजमध्ये असू शकतो ड्यूल कॅमेरा सेटअप

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo