ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात VoLTE सह 4G LTE सपोर्ट दिला आहे. हा फोन 4G LTE ने सुसज्ज असलेला हा देशातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे.
रिलायन्स डिजिटलने मागील आठवड्यातच बाजारात आपला नवीन फोन LYF फ्लेम 2 लाँच केला होता. आता कंपनीने बाजारात आपला हा नवीन स्मार्टफोन LYF फ्लेम 3 लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत केवळ ३,९९९ रुपये आहे. तथापि, ह्या फोनला आतापर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केले गेले नाही. मात्र हा फोन प्री-ऑर्डर साठी शॉपिंग साइट होमशॉप 18 वर उपलब्ध झाला आहे.
ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात VoLTE सह 4G LTE सपोर्ट दिला आहे. हा फोन 4G LTE ने सुसज्ज असलेला हा देशातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. रिलायन्स डिजिटल LYF फ्लेम 3 स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची WVGA IPS डिस्प्ले दिली आहे, ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 800×480 पिक्सेल आहे. हा फोन 1.5GHz क्वाड-कोर प्रोससेरसह लाँच केला गेला आहे. ह्यात 512MB ची रॅम दिली आहे. हा फोन 4GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे आणि मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ह्याचे स्टोरेज 32GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्यात 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा देण्यात आला आहे. ह्यात 1700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्ससुद्धा देण्यात आले आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे, जो 3.5mm जॅकसह येतो. हा फोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. \