LYF अर्थ 2 स्मार्टफोन लाँच, किंमत २०,९९९ रुपये

Updated on 28-Jun-2016
HIGHLIGHTS

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ह्या स्मार्टफोनला २०,९९९ रुपयात लिस्ट केले गेले आहे. ह्यात 3GB ची रॅम देण्यात आली आहे.

LYF अर्थ 2 स्मार्टफोन भारतात लाँच केला. कंपनीने आपल्या ह्या फोनला मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान लाँच केले. हा कंपनीचा सर्वात महागडा फोन आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ह्या स्मार्टफोनला २०,९९९ रुपयात लिस्ट केले गेले आहे. हा काळा, हिरवा, सोनेरी आणि पांढ-या रंगात उपलब्ध होईल.

ह्या स्मार्टफोनमध्ये एक फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आले आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा 4G सपोर्टसह येतो. ह्यात 5 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ही डिस्प्ले 1080×1920 पिक्सेलने सुसज्ज आहे. हा अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा 1.5GHz ऑक्टा-कोर  स्नॅपड्रॅगन 615 (MSM8939) प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 3GB रॅमसुद्धा देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनची सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात १९ प्रकारचे जेस्चर्स देण्यात आले आहेत, ज्याच्या साहाय्याने आपण कोणतेही अॅप्लीकेशन त्वरित उघडू शकतो. तसेच ह्याच्या फिंगरप्रिंट सेंसरसाठी आपण आपल्या पाचही बोटे वापरु शकतो.

हेदेखील वाचा – शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात खूप महत्त्वपुर्ण आहेत हे ७ आकर्षक लॅपटॉप्स

हा फोन १३ मेगापिक्सेलच्या फ्रंट आणि रियर कॅमे-यासह येतो. ह्याच्या रियर कॅमे-यामध्ये लेजर ऑटोफोकससुद्धा देण्यात आले आहे. फोनमध्ये दोन कॅमेरा फ्लॅश देण्यात आले आहे. फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवता येते. ह्यात 2500mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात 4G LTE, VoLTe, वायफाय, ब्लूटुथ, GPS आणि मायक्रो-USB सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स दिले गेले आहे. ह्याचा आकार 142x67x7.2mm आणि वजन 140 ग्रॅॅम आहे.

हेदेखील वाचा – मोटो Z, मोटो Z फोर्स स्मार्टफोन्स सप्टेंबरमध्ये होणार भारतात लाँच?
हेदेखील वाचा – शाओमीने लाँच केली एक इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :