मोबाईल निर्माता कंपनी मायक्रोसॉफ्ट लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लुमिया 850 सादर करेल. सध्यातरी ह्या स्मार्टफोनविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र आता ह्या स्मार्टफोनविषयी नवीन खुलासा समोर आला आहे, ज्यात ह्याचे डिझाईन समोर आले आहे.
इंटरनेटवर ह्या स्मार्टफोनचे काही फोटो लीक झाले आहेत. ह्या फोटोंमध्ये स्मार्टफोनला संरक्षित केस असल्याचे दिसत आहे. ह्या फोटोंच्या आधारावर स्मार्टफोनच्या डिझाईनचा अनुमान लावता येईल. हे फोटो आणि ही माहिती गिजमोचाइनाद्वारा दिली गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा बॅक पॅनलवर टॉपमध्ये वरच्या बाजूस आहे. त्यावर LED फ्लॅश दिला आहे. पॉवर बटण आणि वॉल्यूम बटन स्मार्टफोनच्या उजव्या बाजूला दिले आहे. फोटोंमध्ये दिसत आहे की, हा स्मार्टफोन निळ्या रंगात आहे. तथापि, ह्याचा जास्त भाग संरक्षित केसमुळे लपलेला आहे. त्यामुळे लूमिया 850 विषयी आतापर्यंत काही जास्त माहिती मिळालेली नाही.
ह्याआधीही ह्या स्मार्टफोनविषयी काही लीक्स समोर आले आहे. अलीकडेच ह्या स्मार्टफोनची काही चित्रे समोर आली होती, ही नवीन चित्र @evleaks द्वारा जारी केली होती. @evleaks द्वारा जारी केलेल्या फोटोंमध्ये लूमिया 850 स्मार्टफोनचे डिझाईन साफ दिसत आह. ह्या डिझाइनमध्ये स्पष्टपणे पाहू शकतो की, मायक्रोसॉफ्टच्या ह्या नवीन स्मार्टफोनला फ्रंट कॅमेरा LED फ्लॅशसह असेल. ह्या स्मार्टफोनच्या मागील भागात ह्याचा रियर कॅमेरासुद्धा दिसत आहे. त्याचबरोबर बाजूला सोनेरी रंगात मेटल फ्रेमसुद्धा दिसत आहे.
त्याचबरोबर ऑनलाइन वेबसाइट Baidu वर सुद्धा ह्याचे फोटो लीक झाले होते. ह्यावर ह्या स्मार्टफोनचे अजू दोन कलर दाखवले होते. एक पांढरा आणि रोझ गोल्ड फ्रेम कॉम्बिनेशन आणि दुसरा काळा आणि कॉपर फ्रेम कलर कॉम्बिनेशनमध्ये दिसत होता.
ह्या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाची HD डिस्प्ले असेल. तथापि, काही लीक्सनुसार, ह्यात 5.7 इंचाची डिस्प्ले असेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 410 SoC चिपसेट किंवा स्नॅपड्रॅगन 617 SoC ने सुसज्ज असेल.
हा स्मार्टफोन १० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 किंवा 8 मेगापिक्सेलच्या फ्रंट कॅमे-याने सुसज्ज असेल. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ आणि GPS सारखे फीचर्ससुद्धा असतील.