ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ४.७ इंचाच्या HD डिस्प्लेसह 1.1GHz चे स्नॅपड्रॅगन २१० क्वाड-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या डिवाइसमध्ये 1GB ची रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 200GB पर्यंत वाढवू शकतो.
ह्या फोनमध्ये 2100mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे आणि फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटो फोकस रियर कॅमेरा f/2.4 अॅपर्चर आणि सिंगल LED फ्लॅशसह दिला आहे. तसेच २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे.
त्याचबरोबर मायक्रोसॉफ्ट आपल्या काही अन्य स्मार्टफोनला लाँच करण्याची योजना बनवत आहे. हा स्मार्टफोन लुमिया 650 आणि 850 असू शकतात, ज्यांचे कोडनाव सायमा आणि साना असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोनला 2016 मध्ये कधीही लाँच केले जाऊ शकते. त्याशिवाय मायक्रोसॉफ्ट अजून एका स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याच्याविषयी अजूनपर्यंत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अफवांवरुन असे समोर येतेय की, हा स्मार्टफोन पुर्ण मेटल बॉडीने बनला असेल आणि हा विंडोज 10 सह बाजारात येईल.