digit zero1 awards

लो बजेट मोबाइल Tecno POP 8 भारतात लाँच, जाणून घ्या Affordable स्मार्टफोनमध्ये काय मिळेल विशेष? Tech News 

लो बजेट मोबाइल Tecno POP 8 भारतात लाँच, जाणून घ्या Affordable स्मार्टफोनमध्ये काय मिळेल विशेष? Tech News 
HIGHLIGHTS

कंपनीने अधिकृत वेबसाइटद्वारे Tecno POP 8 भारतात लाँच केले आहे.

Tecno Pop 8 मध्ये विस्तारित RAM तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

हा स्मार्टफोन कंपनीने परवडणाऱ्या श्रेणीत म्हणजेच बजेट विभागात सादर केला आहे.

टेक ब्रँड Tecno ने आपला नवीन लो बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला आहे. कंपनीने अधिकृत वेबसाइटद्वारे Tecno POP 8 भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन कंपनीने परवडणाऱ्या श्रेणीत म्हणजेच बजेट विभागात सादर केला आहे. कंपनीचे बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अधिक लोकप्रिय आहेत. Techno Pop 8 वेबसाइटवर तीन मेमरी प्रकारांमध्ये सूचीबद्ध आहे. यामध्ये 3GB RAM + 64GB ROM, 4GB RAM + 64GB ROM आणि 4GB RAM + 128GB ROM चा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा: Apple Scary Fast Event: नवीन 14 इंच आणि 16 इंच MacBook Pro M3 चिपसह लाँच, जाणून घ्या किंमत

Tecno POP 8 चे फीचर्स

Techno Pop 8 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही पंच-होल स्टाईल स्क्रीन LCD पॅनेलवर बनविली गेली आहे आणि 90Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह आहे. स्मार्टफोन Unisoc T606 octacore प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. Tecno Pop 8 मध्ये विस्तारित RAM तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे.

TECNO POP 8
TECNO POP 8

फोटोग्राफीसाठी, Tecno POP 8 ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात F/1.8 अपर्चर आणि सेकंडरी AI लेन्ससह 13 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आहे. त्याबरोबरच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 10W चार्जिंग तंत्रज्ञान देखील आहे.

फोनमधील उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, टेक्नो पॉप 8 मध्ये 1TB SD कार्डसाठी सपोर्ट आहे. तर, सुरक्षेसाठी फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 100% रिसायकल करण्यायोग्य बॅक कव्हर वापरण्यात आले आहे. Tecno POP 8 ची जाडी फक्त 8.75mm आहे. फोनमध्ये डबल डीटीएस स्पीकर देण्यात आले आहेत. त्यात FM रेडिओ आणि OTG सारखे पर्यायही उपलब्ध आहेत.

अपेक्षित किंमत

ब्रँडने अद्याप किंमत जाहीर केलेली नाही परंतु Tecno POP 8 ची किंमत 6,999 रुपयांपासून सुरू होऊ शकते. हा फोन मिस्ट्री व्हाईट, अल्पेन्ग्लो गोल्ड, मॅजिक स्किन आणि ग्रॅव्हिटी ब्लॅक कलरमध्ये हा फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo