प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर म्हणून ओखली जाणारी स्मार्टफोन निर्माता OnePlus ने या वर्षी आपला स्मार्टफोन OnePlus Nord CE4 5G भारतात लाँच केला होता. जर तुम्ही स्वस्तात भारी OnePlus स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. कारण, एप्रिल महिन्यात लाँच झालेल्या OnePlus Nord CE4 5G वर ब्रँड 3,000 रुपयांची सूट देत आहे. एवढेच नाही तर, यासह महागडे इयरबड्स देखील मोफत मिळणार आहेत. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला घाई करावी लागेल. पाहुयात ऑफर्स-
Also Read: आगामी OPPO Reno 13 सिरीजच्या भारतीय लाँचची पुष्टी! कंपनीने शेअर केले तपशील, मिळेल 50MP सेल्फी कॅमेरा
OnePlus Nord CE4 5G दोन व्हेरिएंट्समध्ये येतो. 8GB RAM + 128GB स्टोरेज ऑफरसह बेस मॉडेलची किंमत 21,999 रुपये असेल आणि 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये असेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 2000 रुपयांची फ्लॅट ऑफर आणि ICICI आणि वन कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1000 रुपयांची बँक ऑफर मिळेल. लक्षात घ्या की, लाँचच्या वेळी या दोन्ही मॉडेल्सची किंमत 24,999 रुपये आणि 26,999 रुपये इतकी होती. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा.
तसेच तुम्ही हा फोन EMI आणि एक्सचेंज ऑफरद्वारे देखील खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 19,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज सूट मिळू शकते. हा OnePlus फोन डार्क क्रोम आणि सेलाडॉन मार्बल या दोन कलर ऑप्शन्ससह येतो. विशेष म्हणजे तुम्हाला या फोनसह OnePlus Buds 2r अगदी मोफत मिळणार आहेत.
OnePlus Nord CE4 5G मध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्स आणि प्रोसेसिंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 8GB RAM + 8GB विस्तारणीय रॅम आणि 256GB स्टोरेज ऑफर करतो. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी हा फोन IP54 रेटेड आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP चा Sony LYT600 मुख्य सेन्सर आणि मागील पॅनलवर 8MP अल्ट्रा-वाइड IMX355 लेन्स आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येते.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.