मोबाईल निर्माता कंपनी एलजीने आपला नवीन स्मार्टफोन झिरो सादर केला आहे. ह्या आठवड्यात हा स्मार्टफोन तायवानमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर ह्या एशिया, युरोप आणि लॅटिन अमेरिकेच्या निवडक देशांत उपलब्ध केला जाईल. सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आशा आहे की, हा स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. हा स्मार्टफोन वक्र ग्लास डिझाईनसह येतो, ज्याला 3D इफेक्ट मिळतो. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने २टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.. हा स्मार्टफओन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. हा स्मार्टफोन 2050mAh च्या बॅटरीने सुसज्ज आङे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, 3G, वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.1, GPS, NFC आणि मायक्रो-USB फीचर्स दिले गेले आहे.
एलजी झिरो स्मार्टफोन मेटल बॉडी डिवाइस आहे. ह्या डिवाइसमध्ये पॉवर आणि वॉल्यूम रॉकर बटन रियर पॅनलवर बनवले आहे. हँडसेटमध्ये एलजीचा लोगो फ्रंट आणि बॅक पॅनलवर दिला गेला आहे. स्मार्टफोनचे परिमाण 142×71.8×7.4mm आहे. आणि ह्याचे वजन १४७ ग्रॅम आहे.