LG X5 (2018) स्मार्टफोन दक्षिण कोरिया मध्ये 4,500mAh क्षमता असलेल्या बॅटरी सह सादर

Updated on 20-Jun-2018
HIGHLIGHTS

LG ने आपला LG X5 स्मार्टफोन 2016 मध्ये लॉन्च केला होता, पण त्यावेळी या स्मार्टफोन ची स्पेक्स शीट इतकी खास वाटत नव्हती, तसेच त्यावेळी या डिवाइसला एक मोठी बॅटरी पण देण्यात आली नव्हती.

LG ने आपला LG X5 स्मार्टफोन 2016 मध्ये लॉन्च केला होता, पण त्यावेळी या स्मार्टफोन ची स्पेक्स शीट इतकी खास वाटत नव्हती, तसेच त्यावेळी या डिवाइसला एक मोठी बॅटरी पण देण्यात आली नव्हती. पण आता हा डिवाइस कंपनी ने साउथ कोरिया मध्ये पुन्हा एकदा एका नवीन किंमतीत सादर केला आहे. हा डिवाइस तिथे 330 डॉलर म्हणजे जवळपास Rs 22,455 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे, तसे पाहता ही किंमत काही कमी नाही. LG X5 (2018) स्मार्टफोन tumhi मोरक्कन ब्लू कलर मध्ये घेऊ शकता. 

या डिवाइस मध्ये एक मोठा बदल शोधल्यास यांच्या डिजाईन मध्ये खुप फरक दिसत आहे. यावेळीची डिजाईन जास्त प्रीमियम दिसत आहे असे आपण म्हणू शकतो. फोन यावेळी पण 5.5-इंचाच्या स्क्रीन सह सादर करण्यात आला आहे, परंतु यावेळी चे स्पेक्स पाहता या डिवाइस ला आधी पेक्षा काही नवीन स्पेक्स देण्यात आले आहेत. 
 
स्मार्टफोन च्या स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस मध्ये तुम्हाला एक नवीन ओक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एक 5.5-इंचाची स्क्रीन मिळत आहे. फोन 32GB च्या स्टोरेज सह सादर करण्यात आला आहे. पण रॅम मध्ये कोणताही बदल दिसत नाही. फोन मध्ये आताही 2GB चा रॅम आहे. 

कॅमेरा च्या बाबतीत पण डिवाइस मध्ये कोणताही बदल दिसत नाही, याचा अर्थ असा की या डिवाइस मध्ये तुम्हाला आधी प्रमाणे एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा मिळत आहे, तसेच यात एक 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे, फोन एंड्राइड 8.0 Oreo वर काम चालतो आणि यात एक मोठी बॅटरी म्हणजे 4,500mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, विशेष म्हणजे जुन्या डिवाइस मध्ये तुम्हाला एक 2,800mAh क्षमता असलेली बॅटरी मिळाली होती. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :