LG W10, W30 चा पुढील सेल 10 जुलैला, पहिल्या सेल मध्ये अशी झाली डिवाइसची विक्री
LG W10 ची भारतात किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे
LG W30 किंमत 9,999 रुपये रुपयांपासून सुरु होत आहे
LG W30 मध्ये आहे 6.26-inch डिस्प्ले
LG आपल्या W सीरीजच्या लेटेस्ट स्मार्टफोन्स LG W10 आणि W30 चा पुढील सेलचे आयोजन 10 जुलैला अमेझॉन वर करणार आहे. या पुढील सेल बद्दल कंपनीने एक ट्वीट पण केले आहे ज्यात पुढील सेलचा खुलासा आहे. सोबतच साउथ कोरियन कंपनी LG ने असा दावा पण केला आहे कि पहिल्या सेल मध्ये त्याच्या या नव्या सीरिजने चांगले प्रदर्शन केले आहे.
WoW! We're are completely SOLD OUT. #LGWSeries will be back with LG W10 and LG W30 Smartphones in next sale on 10th July, at @amazonIN. Stay tuned! #ThreeIsIn pic.twitter.com/l2eX3luvt2
— LG India (@LGIndia) July 3, 2019
Amazon वर W10 आणि W30 स्मार्टफोन्सची पहिली बॅच फक्त 12 मिनिटांत विकली गेली. LG W-series smartphones भारतात गेल्याच आठवड्यात लॉन्च केले गेले होते. हे डिवाइस Android, 4,000mAh बॅटरी, AI-powered cameras सह येतात. एका प्रेस नोट नुसार LG च्या W10 आणि W30 स्मार्टफोन्सनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये चांगले प्रदर्शन केले पण कंपनीने किती यूनिट्स सेल मध्ये विकले गेले याचा खुलासा केला नाही.
LG W10, LG W30 ची भारतात किंमत
LG W10 आणि W30 स्मार्टफोन्स तुम्ही Amazon द्वारे विकत घेऊ शकता. LG W10 ची किंमत 8,999 आहे आणि LG W30 तुम्हाला 9,999 रुपयांमध्ये मिळतो. तसेच जर तिसऱ्या वेरिएंट LG W30 Pro बद्दल बोलायचे तर याच्या सेल बद्दल अजूनतरी उल्लेख करण्यात आला नाही. LG W10 तुम्ही Tulip Purple आणि Smokey Grey कलर मध्ये विकत घेऊ शकता आणि LG W30 Thunder Blue, Platinum Grey आणि Aurora Green कलर मध्ये घेऊ शकता.
LG W10 स्पेसिफिकेशंस
या फोन मध्ये तुम्हाला 6.19 इंचाचा फुलविजन डिस्प्ले आणि 2Ghz ऑक्टा कोर Helio P22 सह मिळतो. फोन मध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी ची स्टोरेज देण्यात आली आहे. ऑप्टिक्स अंतर्गत यात ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात पहिला सेंसर 13 मेगापिक्सलचा आणि दुसरा सेंसर 5 मेगापिक्सलचा आहे. सोबत तुम्हाला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी मिळतो.
तसेच कंपनीने LG W10 मध्ये तुम्हाला 4,000mAh ची बॅटरी दिली आहे. फोन मध्ये ड्यूल 4G सिम आणि वेगळा कार्ड स्लॉट सपोर्ट देण्यात आला आहे. फोन मध्ये फेस अनलॉक आणि बोके मोड इफेक्टचा फीचर पण आहे. फिंगरप्रिंट सेंसर सह आहे डिवाइस येतो. स्मार्टफोन Tulip Purple, Grey आणि Smokey Grey कलर मध्ये सादर केला गेला आहे.
LG W30 स्पेसिफिकेशंस
LG W30 मध्ये तुम्हाला 6.26 इंचाचा HD+IPS Dot फुलविजन डिस्प्ले मिळतो. सोबतच फोन मध्ये 2Ghz ऑक्टा कोर Helio P22 आहे. कंपनीने फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ड्यूल 4G हाइब्रिड स्लॉट सह डिवाइस येतो आणि यात तुम्हाला फेस अनलॉक आणि बोके मोड इफेक्टचा फीचर पण मिळतो.
ऑप्टिक्स पाहता फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहला सेंसर 12 मेगापिक्सलचा दूसरा सेंसर 13 मेगापिक्सलचा आणि तीसरा सेंसर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी तुम्हाला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. सोबत यात स्टोरेज साठी 3 जीबी रॅम आणि 32 जीबी देण्यात आली आहे. यात फिंगरप्रिंट सेंसर फीचर पण आहे.