मोबाईल निर्माता कंपनी एलजीने अलीकडेच आपला नवीन स्मार्टफोन V10ला लाँच केले होते. अजूनपर्यंत तरी ह्या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र आता ह्या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा पुढील आठवड्यापासून उपलब्ध केला जाईल.
हाती आलेल्या माहितीनुसार, कंपनीचा अल्ट्रा स्मार्टफोन सर्वात आधी युएस,चायना आणि हाँगकाँग मध्ये उपलब्ध होईल आणि त्यानंतर हा उत्तर अमेरिका, युरोप, एशिया, लॅटिन अमेरिका आणि मिडल ईस्टमध्ये उपलब्ध केला जाईल.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५.७ इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन २५६०x१४४० पिक्सेल आहे. ह्या डिस्प्लेच्या वर एक टिकर डिस्प्ले दिला गेला आहे, जो नेहमी चालू असतो. सेकेंडरी डिस्प्लेचा आकार २.१ इंच आहे. आपण टिकरच्या डिस्प्लेवर हवामान, वेळ,तारीख आणि बॅटरीची स्थिती ह्याबाबत माहिती पाहू शकता. त्याशिवाय यूजर स्क्रिनवर आपले आवडीचे अॅप्स खरेदी करु शकता. कोणताही संपर्क किंवा नोटीफिकेशन बघायचे असेल तर हे सर्व आपण सेकेंडरी डिस्प्लेवर पाहू शकता. त्याचबरोबर हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८०८ प्रोसेसर आणि ४जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ६४जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या माध्यमातून २टीबीपर्यंत वाढवू शकता. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात सेकेंडरी डिस्प्लेच्या वर दोन फ्रंट कॅमेरे दिले गेले आहे. दोन्ही कॅमे-यांमध्ये ५ मेगापिक्सेलचा सेंसर आहे. एक कॅमेरा १२० डिग्री वाइड अँगल दिला आहे, तर दुसरा ८० डिग्रीचा. ह्या दोघांना एकत्र वापरल्यास 3D इमेज आऊटपूट मिळू शकतो. त्याचबरोबर ह्यात एक असे सॉफ्टवेअर दिले गेले आहे, ज्याच्या मदतीने दोन्ही कॅमे-यांनी वेगवेगळे घेतलेले फोटोजसुद्धा जोडू शकता. त्याचबरोबर ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा f/1.8 अॅपर्चर आणि OIS २.०ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात ३०००mAhची बॅटरी दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनचे परिमाण 159.6×79.3×8.6mm आहे आणि ह्याचे वजन १९२ ग्रॅम आहे.
४जी सपोर्टच्या व्यतिरिक्त ह्या स्मार्टफोनमध्ये वायफाय ८०२.११ a/b/g/n/ac, ब्लूटूथ ४.१, NFC, USB 2.0 कनेक्टिव्हिटी फिचर आहे. स्मार्टफोन स्पेस ब्लॅक, लक्स व्हाईट, मॉडर्न बॅग, ओशियन ब्लू आणि ओपल ब्लू कलर ह्या रंगात उपलब्ध होईल.