LG V35, X2 आणि X5 स्मार्टफोन सह पाच स्मार्टफोन्स करू शकते लॉन्च
LG ने काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन LG G7 ThinQ लॉन्च केला आहे आणि आता कंपनी आपले काही स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.
LG ने काही दिवसांपूर्वी आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन LG G7 ThinQ लॉन्च केला आहे आणि आता कंपनी आपले काही स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. असा अंदाज लावला जात आहे की कंपनी कडून त्यांचे 5 लो एंड स्मार्टफोन्स लॉन्च केले जाऊ शकतात, हे स्मार्टफोन्स पुढील महिन्यात कोरिया मध्ये लॉन्च केले जातील अशा बातम्या येत आहेत. ETNews वर विश्वास ठेवल्यास LG सोबत दक्षिण कोरिया च्या अन्य तीन टेलीकॉम कंपन्या 5 स्मार्टफोन्स जून मध्ये सादर करू शकते. या आगामी स्मार्टफोन्स मध्ये कंपनी चे LG V35, LG Q7, LG Q7+, LG X2 आणि LG X5 स्मार्टफोन असू शकतात.
या स्मार्टफोन्स बद्दल बोलायचे झाले तर LG V35 च्या बाबतीत बोलले जात आहे की हा एक प्रीमियम डिवाइस असणार आहे आणि हा LG G7 ThinQ सारख्या स्पेक्स सह लॉन्च केला जाऊ शकतो. या डिवाइस मध्ये क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर व्यतिरिक्त 6GB चा रॅम आणि 64GB ची स्टोरेज पण असणार आहे, तसेच या डिवाइस मध्ये एक 6-इंचाचा Notch असलेला OLED फुलविजन डिस्प्ले असेल, ही एक QHD+ स्क्रीन असेल.
त्याचबरोबर LG Q7 आणि LG Q7+ स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी Quasi-Premium Q7 आणि Q7 स्मार्टफोन्स च्या रुपात लॉन्च करण्यात आले आहेत, या स्मार्टफोन्स मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 450 मिळत आहे. तसेच या फोन मध्ये क्रमश: 3GB रॅम सह 32GB ची स्टोरेज आणि 4GB चा रॅम आणि 64GB ची स्टोरेज मिळत आहे.
तर इतर दोन स्मार्टफोन म्हणजे LG X2 आणि LG X5 बद्दल बोलायचे तर हे डिवाइस एंट्री-लेवल स्मार्टफोन्स आहेत. X5 पाहता फोन मध्ये एक 4000mAh क्षमता असलेली बॅटरी फास्ट चार्जिंग सह मिळत आहे, त्याचबरोबर यात एक 5.5-इंचाचा डिस्प्ले आणि मीडियाटेक MT6750 चिपसेट मिळत आहे. तसेच X2 पाहता यात स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट सह 2GB चा रॅम 32GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.