ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर दिला गेला आहे. हा डिवाइस 3GB रॅमसह लाँच केला गेला आहे आणि ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता LG ने मार्केटमध्ये आपला नवीन फॅबलेट स्टायलस 2 प्लस लाँच केला आहे. सध्यातरी ह्या डिवाइसला तायवानमध्ये लाँच केेले गेले आहे. हा नवीन फॅबलेट बाजारात आधीपासून असलेला स्टायलस 2 पेक्षा जास्त चांगला आहे.
ह्यात 5.7 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरसुद्धा दिले गेले आहे. हा डिवाइस 3GB रॅमसह लाँच केला गेला आहे आणि ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल.
LG स्टायलस 2 प्लसमध्ये १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्या डिवाइसचा आकार 155×79.6×7.4mm आहे. ह्याचे वजन 146 ग्रॅम आहे. ह्या डिवाइसच्या आत आपल्याला 3000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्या डिवाइसमध्ये कॅट 4LTE सपोर्ट देण्यात आले आहे. हा एक ड्यूल सिम डिवाइस आहे. हा डिवाइस अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्याची किंमत TWD 10,990 ($340) ठेवण्यात आली आहे. LG स्टायलस 2 प्लस डिवाइस जून महिन्याच्या शेवटपर्यंत तायबान बाजारात उपलब्ध केला जाईल. तथापि,हा डिवाइस दुस-या देशांत कधीपर्यंत उपलब्ध होईल ह्याविषयी अजून तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही.