हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 चिपसेट आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
मोबाईल निर्माता कंपनी एलजी आपला नवीन स्मार्टफोन स्पिरिट LTE भारतात लवकरच लाँच करेल. एलजी इंडियाने ह्यासंबंधी माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन मल्टी-ब्रँड आऊटलेटमध्ये उपलब्ध आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. स्पिरिट LTEच्या 3G प्रकाराला एलजी स्पिरिट च्या नावाने ओळखले जाते. ह्याची विक्री मार्च महिन्यापासून सुरु होईल. ह्या नवीन स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्यात 4G LTE साठी सपोर्ट आहे.
त्याचबरोबर कोरियाच्या कंपनीने अशी माहिती दिली आहे, एलजी G4 स्टायलससुद्धा रिटेल स्टोरमध्ये उपलब्ध केला जाईल. हा स्मार्टफोन भारतात जुलै महिन्यात उपलब्ध होईल. दोन्ही स्मार्टफोनसाठी एलजीने रिलायन्स रिटेलसह करार केला आहे.
एलजी स्पिरिट LTE स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.7 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर त्याची पिक्सेल तीव्रता 312ppi आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 चिपसेट आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवता येऊ शकते. हा स्मार्टफोन 2100mAh च्या बॅटरीने सुसज्ज आहे.
ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि १ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. एलजी स्पिरिट LTE एक ड्यूल सिम फोन आहे आणि हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर काम करतो. एलजी स्पिरिट LTE मध्ये 4G शिवाय 3G, वायफाय, ब्लूटुथ, GPRS/A-GPS, मायक्रो-USB कनेक्टिव्हिटी वैैशिष्ट्य आहे.