एलजीने लाँच केला LG Ray स्मार्टफोन

Updated on 26-Nov-2015
HIGHLIGHTS

एलजीने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन LG Ray लाँच केला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाच्या उत्कृष्ट डिस्प्लेसह ऑक्टा-कोर प्रोसेसरसुद्धा दिला आहे.

एलजीने CIS(Commonwealth of independent States) मध्ये बुधवारी आपला नवीन स्मार्टफोन LG Ray लाँच केला. ह्या स्मार्टफोनला इतर देशांत कधी लाँच केले जाईल, याबाबत अजून कोणतेही संकेत मिळालेले नाही. तसेच ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अजून काही निश्चित सांगता येणार नाही.

 

स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. तसेच ह्याची पिक्सेल तीव्रता 267ppi आहे. ह्यात 1.4GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला गेला आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅमसुद्धा आहे. हा स्मार्टफोन ड्युल सिमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात सिंगल सिम व्हर्जनसुद्धा लाँच केला गेला आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे.

 

डिवाइसमध्ये आपल्याला 16GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवले जाऊ शकते, मात्र ह्याबाबत अजून काही सांगितले गेले नाही. स्मार्टफोनमध्ये ३०००mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. स्मार्टफोनमध्ये 3G सह वायफाय 802.11/b/g/n, ब्लूटुथ 4.0 आणि USB 2.0 सुद्धा दिला गेला आहे. मात्र हा डिवाईस 4G LTE सह बाजारात आला नाही.

ह्याआधी अशीही बातमी आली होती की, LG आपला नवीन स्मार्टफोन G5 लाँच करेल. सध्यातरी अशी खबर आहे की, ह्या स्मार्टफोनला कंपनी मेटल युनीबॉडीसह सादर करेल. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :