4GB रॅम आणि मीडियाटेक हीलियो P10 SoC सह गीकबेंच वर दिसला LG Q7 स्मार्टफोन
कंपनी ने Q Note मोनिकर साठी ट्रेडमार्क कडे रिक्वेस्ट केली आहे, ज्यामुळे शक्यता वाटते की डिवाइस स्टाइलस सह Q7 Note च्या रुपात लॉन्च केला जाईल.
LG Q7 एक परवडणारा स्मार्टफोन असू शकतो ज्यावर कंपनी काम करत आहे. Q सीरीज डिवाइसना फ्लॅगशिप G सीरीज डिवाइस एक परवडणारा पर्याय आहे.
गीकबेंच वर डिवाइस बद्दल नवीन माहिती मिळाली आहे. बेंचमार्क लिस्टिंग वरून समजले आहे की डिवाइस मध्ये 1.51GHz ओक्टा-कोर मीडियाटेक हीलियो P10 प्रोसेसर आणि 4GB रॅम असू शकतो. मागच्या वर्षीच्या LG Q6 पहिला तर हा खुप वेगळा आहे कारण आधीच्या डिवाइस मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 435 SoC होता. पण असेही होऊ शकते की हा डिवाइसचा फक्त एक वेरिएंट असेल.
LG च्या या स्मार्टफोनला बेंचमार्क वर सिंगल कोर टेस्ट मध्ये 630 पॉइंट आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 2322 पॉइंट्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे डिवाइस एंड्राइड 8.1 ओरियो सह लॉन्च होऊ शकतो. हा मॉडेल नंबर LM-Q710.FG नावाने लिस्टेड आहे.
अजून पर्यंत या डिवाइस च्या डिजाइन बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही पण काही अंदाज लावले जात आहेत की डिवाइस मध्ये एक मोठा डिस्प्ले असेल ज्याच्या टॉप वर नॉच असेल. LG G7 ThinQ पण याच डिस्प्ले सह लॉन्च केला होता. कंपनी ने Q Note मोनिकर साठी ट्रेडमार्क कडे रिक्वेस्ट केली आहे, ज्यामुळे शक्यता वाटते की डिवाइस स्टाइलस सह Q7 Note च्या रुपात लॉन्च केला जाईल.
मागच्या वर्षी कंपनी ने जुलै मध्ये LG Q6 स्मार्टफोन ची घोषणा केली होती आणि ऑगस्ट मध्ये हा डिवाइस लॉन्च केला होता. यावर्षी पण शक्यता आहे की कंपनी याचवेळी Q7 स्मार्टफोन लॉन्च करेल. डिवाइस ची घोषणा जून च्या शेवटी किंवा जुलै च्या सुरवातीला होऊ शकते.
अजून तरी या डिवाइस च्या किंमतीच्या बाबतीत कोणतीही माहिती मिळाली नाही, पण शक्यता आहे की डिवाइस ची किंमत $300 (जवळपास Rs. 20,000) असेल. Sashyatri या डिवाइस बद्दल कंपनी कडून अधिकृत माहितीची वाट बघितली जात आहे.
नोट: फीचर्ड इमेज LG Q6 ची आहे.