पाच कॅमेरा सह येईल LG चा पुढील फ्लॅगशिप V40 स्मार्टफोन
LG V40 बद्दल या अफवा समोर येत आहेत की डिवाइस चा फ्रंट कॅमेरा 3D फेस मॅपिंग आणि अनलॉकिंग साठी एका स्टीरियो सिस्टम चा वापर करेल.
LG next flagship V40 smartphone will boast five camera: प्रीमियम स्मार्टफोन च्या दुनियेत टिकने मुश्किल आहे पण LG ने आपल्या आगामी V40 फ्लॅगशिप साठी नवीन पर्याय शोधला आहे. एका नवीन रुमर नुसार LG आपल्या पुढील स्मार्टफोन मध्ये पाच कॅमेरांचा समावेश करेल आणि आशा आहे की हा फोन मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या V30 ची जागा घेईल.
Android Police च्या रिपोर्ट नुसार, V40 च्या बॅक वर तिन रियर कॅमेरा असतील. हे Huawei P20 Pro सारखे आहे जो पहिला असा स्मार्टफोन आहे जो ट्रिपल कॅमेरा सिस्टम सह
लॉन्च करण्यात आला होता. V40 च्या फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप असू शकतो. अशा अफवा पण समोर येत आहेत की फ्रंट कॅमेरा 3D फेस मॅपिंग आणि अनलॉकिंग साठी एका स्टीरियो सिस्टम चा वापर करेल. जर रुमर्स खर्या ठरल्यास हा असा डिवाइस असेल जो 5 कॅमेरा सिस्टम सह येईल.
ज्या प्रमाणे V30 मोठया G6 सारखा वाटतो त्याचप्रमाणे बोलले जात आहे की V40 स्मार्टफोन G7 ThinQ सारखा दिसेल. डिवाइस मध्ये नॉच डिस्प्ले असेल आणि हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 सह येईल. डिवाइस मध्ये कंपनी द्वारा सादर करण्यात आलेल्या Quad DAC फीचर आणि सोबत गूगल असिस्टेंट बटन पण डिवाइस मध्ये असेल आणि डिवाइस च्या बॅक वर एक फिंगरप्रिंट स्कॅनर पण देण्यात येईल.
LG V30 बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 6 इंच OLED क्वॅड HD+ फुल विजन डिस्प्ले आहे, जो 2880x1440p च्या रेजोल्यूशन आणि 18:9 के एस्पेक्ट रेश्यो सह येतो आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. या हँडसेट मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 चिपसेट आहे.
LG V30 च्या बॅक वर 16 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सल चे दोन कॅमेरा आहेत. हा पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे ज्यात f1.6 अपर्चर चे कॅमेरा देण्यात आले होते. 16MP च्या कॅमेरा सोबत f1.6 अपर्चर आणि 13MP चा कॅमेरा f2.2 अपर्चर आणि 90 डिग्री च्या फील्ड व्यू सह येतो.