मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी LG ने भारतात आपला नवीन फोन X स्क्रीन लाँच केला आहे. ह्या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्यात दोन डिस्प्ले दिली गेली आहे. जी प्रत्येक वेळी चालूच राहते. ह्याचा आकार 1.73 इंच आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १२,९९० रुपये आहे. हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
ह्याच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4.93 इंचाची HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×720 पिक्सेल आहे. तर ह्यातील दुस-या डिस्प्लेचा आकार 1.76 इंच आहे, ज्याचे रिझोल्युशन 520×80 पिक्सेल आहे. हा फोन अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. त्याचबरोबर ह्यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट फेसिगं कॅमेरा दिला आहे. हा फोन 2300mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स
ह्या फोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसरसुद्धा दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात 2GB ची रॅम सुद्धा दिली आहे. ह्या फोनमध्ये 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे. ह्या स्टोरेजला आपण 2TB पर्यंत वाढवू शकतो. ह्याचा आकार 142.6×71.8×7.1mm आणि वजन 120 ग्रॅम आहे. ह्यात दोन सिम स्लॉट आहे. हा एक 4G स्मार्टफोन आहे. ह्यात वायफाय, NFC, मायक्रो-USB 2.0 पोर्ट सारखे फिचर्ससुद्धा दिले आहेत.
हेदेखील वाचा – केवळ १ रुपयात मिळणार शाओमी Mi 5, रेडमी नोट 3, Mi मॅक्स स्मार्टफोन
हेदेखील वाचा – एअरटेलने आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी आणली “Happy Hours” ची भेट