मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी LG ने भारतात आपले दोन नवीन स्मार्टफोन LG K7 आणि K10 लाँच केले आहे. कंपनीने LG K7 ची किंमत ९,५०० रुपये आहे तर K10 ची किंमत १३,५०० रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी आपल्या K सीरिजला खूप खास आणि आकर्षक डिझाईनसह लाँच केले आहे.
जर LG K7 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5 इंचाची इन सेल टच डिस्प्ले दिली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 1.5GB रॅमने सुसज्ज आहे. फोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. फोनमध्ये 2125mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. कनेक्टिव्हिटीलसाठी ह्या फोनमध्ये 4G LTE+VoLTE, Vo वायफाय, 3G, 2G सारखी वैशिष्ट्ये दिली आहे. हा फोन टायटन, गोल्ड आणि व्हाइट रंगात मिळेल. फोनमध्ये 2.5D कर्व्ह्ड ग्लाससुद्धा दिली आहे.
तसेच जर LGK10 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 5.3 इंचाची HD इन-सेल टच डिस्प्ले दिली आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 2GB ची रॅम दिली आहे. फोन 16GB च्या अंतर्गत स्टोरेजसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G LTE+VoLTE, Vo वायफाय, 3G, 2G सारखी वैशिष्ट्ये दिली आहे. हा व्हाइट, इंडिगो आणि सोनेरी रंगात मिळेल.
हेदेखील वाचा – भारतात मे महिन्यात येईल Nextbit Robin चा ‘Cloud first’ स्मार्टफोन
हेदेखील वाचा – CREO Mark 1 स्मार्टफोन: दर महिना स्वत:च अपडेट करणार ऑपरेटिंग सिस्टम