LG या धमाकेदार फीचर सह लॉन्च केला आपला एंट्री-लेवल स्मार्टफोन LG K30
काही वेळ चर्चेत राहिल्या नंतर शेवटी कंपनी ने आपला LG K30 स्मार्टफोन US मध्ये लॉन्च केला आहे, हा डिवाइस 225 डॉलर म्हणजे जवळपास Rs 14,998 च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे.
काही वेळ चर्चेत राहिल्या नंतर शेवटी कंपनी ने आपला LG K30 स्मार्टफोन US मध्ये लॉन्च केला आहे, हा डिवाइस 225 डॉलर म्हणजे जवळपास Rs 14,998 च्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डिजाईन आणि लुक च्या बाबतीत हुबेहूब Lg X4\+ सारखा वाटतो. LG चा हा फोन दक्षिण कोरिया मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. जर तुम्ही अमेरिकेत राहत असाला आणि हा डिवाइस घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा डिवाइस T-Mobile च्या माध्यमातून 9 डॉलर च्या कॉन्ट्रॅक्ट सह 24 महिन्यासाठी घेऊ शकता. ही किंमत जवळपास Rs 599 इतकी आहे.
आशा पण बातम्या येत आहेत की हा डिवाइस कंपनी कडून भारत आणि आशिया च्या बाजारात पण लॉन्च केला जाऊ शकतो. या डिवाइस ची सर्वात खास बाब ही आहे की हा स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट सह लॉन्च करण्यात आला आहे. डिवाइस मध्ये एक 13-मेगापिक्सल चा कॅमेरा पण आहे. सोबतच असलेला फिंगरप्रिंट सेंसर याला अजूनच खास बनवतो. आता भरपूर कंपन्या ज्यात आता LG पण सामिल झाली आहे, आपला एंट्री-लेवल स्मार्टफोंस फिंगरप्रिंट सेंसर सह लॉन्च करत आहेत. काही एंट्री-लेवल स्मार्टफोंस मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे.
LG K30 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन
फोन मध्ये तुम्हाला एक 5.3-इंचाचा 1280×720 डिस्प्ले देण्यात आला आहे, फोन मध्ये एक स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट आहे, त्याचबरोबर यात एक 2GB ची रॅम आणि 32GB ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. जी तुम्ही माइक्रोएसडी कार्ड ने वाढवू शकता. स्टोरेज तुम्ही 2TB पर्यंत वाढवू शकता. या डिवाइस मध्ये एक 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोन एंड्राइड 7.1 नौगट वर चालतो. त्याचबरोबर यात एक 2800mAh क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे. सोबतच कंपनी ने यात फास्ट चार्जिंग सपोर्ट पण दिला आहे.