मोबाईल निर्माता कंपनी एलजीने अलीकडेच CES 2016 मध्ये आपला नवीन स्मार्टफोन K10 सादर केला. आता कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी माहिती दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये एलजी K10 LTE प्रकारची किंमत 200,000 कोरियाई वॉन (जवळपास ११,००० रुपये) ठेवली आहे. दक्षिण कोरियामध्ये स्मार्टफोनची विक्री ह्या महिन्याच्या शेवटी सुरु होईल.
ह्या स्मार्टफोनचे इतर प्रकार येणा-या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सादर होतील. त्याचबरोबर कंपनीने अशीही घोषणा केली आहे की, एलजी K10 स्मार्टफोन इंडिगो काळ्या आणि पांढ-या रंगात उपलब्ध होईल.
एलजी K10 स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा दोन व्हर्जनमध्ये सादर केला आहे. ह्याचा व्हर्जन 3G आणि दुसरा 4G आहे. ह्यात 5.3 इंचाची HD डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.
एलजी K10 च्या 3G व्हर्जनमध्ये 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर ह्यात ८ मेगापिक्सेलचारियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात 2300mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
एलजी K10 च्या 4G व्हर्जनमध्ये 1.3GHz किंवा 1.2Ghz क्वाड-कोर प्रोसेसर किंवा 1.14GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर असेल. ह्यात 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा असेल.
एलजी K10 च्या दोन्ही प्रकारांत तीन वेगवेगळे रॅमचे पर्याय उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन्स 1GB, 1.5GB आणि 2.5GB सह लाँच करेल. हा स्मार्टफोन 16GB आणि 8GB च्या अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध केले गेले आहे. ह्यात 2300mAh ची बॅटरीसुद्धा आहे.