LG G7 स्मार्टफोन एकदा पुन्हा इंटरनेट वर झाला लीक, असे असू शकतात याचे स्पेक्स
LG ने आता काही दिवसांपूर्वी सांगितले होते की ते आपले नवीन स्मार्टफोंस लॉन्च करण्या ऐवजी, आपले जुने फोंस नवीन आवृत्ती सह सादर करणार आहेत.
कंपनी ने काही दिवसांपुर्वी सांगितले होते की ते आपले नवीन आणि फ्लॅगशिप स्मार्टफोंस MWC मध्ये सादर करणार नाही. पण तरीही कंपनी ने आपल्या LG V30 च्या दोन अपग्रेडेड आवृत्ती सादर केल्या होत्या, यांना कंपनी ने AI क्षमतेसह V30S ThinQ आणि V30S+ ThinQ नावाने सादर केले होते. पण याचा अर्थ असा नाही की कंपनी आपला LG G7 स्मार्टफोन लॉन्च करणार नाही, हा स्मार्टफोन लॉन्च होण्यास काही वेळ लागू शकतो. पण कंपनी याला नक्कीच लॉन्च करेल.
याचा खुलासा आता case manufacturer Olixar च्या माध्यमातून समोर आला आहे. त्यांनी असे दाखवले आहे की हा फोन पूर्ण झाला आहे. याव्यतिरिक्त हा notch डिजाईन सह लॉन्च केला जाईल, याचा अर्थ हा आहे की हा स्मार्टफोन iPhone X सारख्या डिजाईन सह लॉन्च केला जाणार आहे.
या स्मार्टफोन च्या बाबतित याआधी पण काही गोष्टी समोर आल्या होत्या. या स्मार्टफोनचा काही दिवसांपुर्वी एक पोस्टर लीक झाला होता, जो स्लॅशलीक च्या माध्यमातून समोर आला होता या पोस्टर मध्ये हा स्मार्टफोन एका नव्या कलर वेरिएंट मध्ये दिसला होता.
नवीन रंगा व्यतिरिक्त हा लीक पोस्टर याची पण पुष्टि करत आहे की या स्मार्टफोन मध्ये notch डिजाईन असणार आहे. रंगाबद्दल बोलायाचे झाले तर हा लाइट ग्रीन रंगात दिसला होता. जर अशा प्रकारचा एक लीक समोर आला आहे तर हा स्मार्टफोन या रंगात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की स्मार्टफोन एका बॉटम बेजल सह येत आहे, इथे LG चा लोगो तुम्ही बघू शकता. तसेच या स्मार्टफोन मध्ये पूर्णपणे अल्ट्रा-थिन बेजल्स पण मिळू शकतात. याव्यतिरिक्त स्मार्टफोन मध्ये जसे की तुम्ही बघत आहात यात एक कर्व रियर पॅनल मिळत आहे. सोबतच तुम्हाला इथे एक वर्टीकल ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तसेच तुम्ही इथे याचा फिंगरप्रिंट सेंसर पण बघू शकता.
आता काही दिवसांपूर्वी आलेल्या एका लीक मधून समोर आले होते की स्मार्टफोन एका OLED पॅनल सह लाॅन्च केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त यात एक 6.1-इंचाचा MLCD+ फुलविजन डिस्प्ले मिळणार आहे. तसेच notch चे स्मार्टफोन मध्ये असणे असे दर्शवत आहे की स्मार्टफोन एका 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. याचे स्क्रीन रेजोल्यूशन 3120×1440 पिक्सेल आहे. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो.
फोन मध्ये फोटोग्राफी साठी एक 16-मेगापिक्सल चा ड्यूल कॅमेरा मिळत आहे. यासोबतच यात एक 6GB च्या रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज मिळत आहे. फोनच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 850 डॉलर ते 950 डॉलर च्या आसपास असू शकते. कंपनी हा स्मार्टफोन एप्रिल मध्ये लॉन्च करू शकते आणि बाजारात पोहोचण्यासाठी याला मे पर्यंतचा वेळ लागु शकतो.