मोबाईल निर्माता कंपनी एलजी लवकरच बाजारात आपला स्मार्टफोन G5 लाँच करणार आहे. आतापर्यंत ह्या स्मार्टफोनशी संबंधित सर्व माहिती आपल्या समोर आली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ह्यात ड्यूल रियर कॅमेरा असेल.
ह्यावेळी एक रेडईट यूजरद्वारा ह्या फोनची माहिती लीक केली गेली आहे. ह्या माहितीमध्ये एलजी G5 च्या हार्डवेयरविषयी सांगितले गेले आहे. रेडईटवर जो फोटो पोस्ट केला गेला आहे,त्यात फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा दिसत आहे. त्यातील एक कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आणि दूसरा ८ मेगापिक्सेलचा आहे. लीकमध्ये असेही सांगितले आहे की, एलजी G5 मध्ये 5.3 इंचाचा डिस्प्ले पाहायला मिळेल.
ह्याआधीही ह्या स्मार्टफोनविषयी बरीच माहिती समोर आली आहे. कंपनी ह्या स्मार्टफोनला फेब्रुवारी २०१६ मध्ये सादर करेल, असे सांगितले जातय. ही माहिती विवो वेबसाइटवर देण्यात आली आहे.
ह्याआधी आलेल्या लीक्सनुसार, एलजी G5 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची 2K HD डिस्प्ले दिली गेली आहे, जी की कोर्निंग गोरिल्ला ग्लासने कोटेड असेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.8GHz स्नॅपड्रॅगन 808 सह कोर्टेक्स A57 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज असेल. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
ह्याच्या कनेक्टिव्हीटीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, NFC, GPS आणि ब्लूटुथ फीचर्स आहेत. तर पॉवर बॅकअपसाठी 3000mAh ची बॅटरी असू शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये मेटल यूनीबॉडी असेल. तर एलजीच्या मागील चार G सीरिज स्मार्टफोनमध्ये प्लॅस्टिक बॉडीचा उपयोग केला गेला होता.