एलजीG5 स्मार्टफोनमध्ये असू शकतो टिकर डिस्प्ले

एलजीG5 स्मार्टफोनमध्ये असू शकतो टिकर डिस्प्ले
HIGHLIGHTS

एलजी G5 मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन असेल. G5 मध्ये सेकेंडरी डिस्प्ले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर वेंचर बीटने अशी माहिती दिली आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची QHD डिस्प्ले असू शकते.

मोबाईल निर्माता कंपनी एलजी लवकरच बाजारात आपला स्मार्टफोन G5 लाँच करु शकते. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. आणि आता अशी बातमी मिळत आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये टिकर डिस्प्ले असू शकतो. ह्याचाच अर्थ असा की, ह्यात दोन डिस्प्ले असतील.

 

ही माहिती वेंचर बीटने दिली आहे. लीक केलेल्या माहितीनुसार, एलजी G5 मेटल बॉडी असलेला स्मार्टफोन असेल. G5 मध्ये सेकेंडरी डिस्प्ले असल्याचेही समोर आले आहे. त्याचबरोबर वेंचर बीटने माहिती दिली आहे की, ह्या स्मार्टफोनमध्ये 5.3 इंचाची QHD डिस्प्ले असेल. ह्यात ‘मॅजिक स्लॉट’ असल्याची माहिती समोर आली आहे. हा कोणत्यातरी हार्डवेअर एक्सपान्शनशी संबंधित असेल. ह्याचे टिकर डिस्प्लेचे स्क्रीन रिझोल्युशन 160×1040 पिक्सेल आहे.

अलीकडेच एक रेडईट यूजरद्वारा ह्या फोनविषयी माहिती लीक झाली होती. ह्या माहितीमध्ये एलजी G5 च्या हार्डवेअरविषयी सांगितले होते. रेडइटवर जो फोटो पोस्ट केला होता, त्यात फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा दाखवला गेला होता. फोनमध्ये एक कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आणि दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा दिला गेला आहे. तसेच ह्या लीकमध्ये असे सांगितले होते की, एलजी G5 मध्ये 5.3 इंचाची डिस्प्ले असू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या ह्या स्मार्टफोनला फेब्रुवारी 2016 मध्ये सादर करु शकते. ही माहिती विबो वेबसाइटवर दिली होती.

ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE , NFC, GPS आणि ब्लूटुथ फीचर्स असतील. तर पॉवर बॅकअपसाठी 3000mAh बॅटरी असू शकते.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo