मोबाईल निर्माता कंपनी एलजी लवकरच बाजारात आपला नवीन स्मार्टफोन G5 लाँच करेल. ह्या स्मार्टफोनशी संबंधित काही माहिती समोर आली आहे. आणि आता अशी बातमी मिळत आहे की, कंपनीे ह्या स्मार्टफोनला फेब्रुवारी २०१६ मध्ये सादर करेल.
ही माहिती विवो वेबसाइटने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एलजी आपल्या स्मार्टफोनला लवकरच सादर करेल. हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. त्याचबरोबर अशी आशा आहे की, एलजी G4 स्मार्टफोन मेटल बॉडीने सुसज्ज असेल. कंपनीने अलीकडेच पुर्ण मेटल बॉडीने बनलेला एलजी झिरो स्मार्टफोन लाँच केला होता.
ह्याआधी ह्या स्मार्टफोनबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. मागे दिल्या गेलेल्या काही लीक्सनुसार, एलजी G5 स्मार्टफोनमध्ये 5. 5 इंचाची 2K HD डिस्प्ले दिली गेली आहे, जी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने सुरक्षित असेल. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.8GHz स्नॅपड्रॅगन 808 सह कोर्टेस A57 चिपसेट आणि 3GB रॅमने सुसज्ज असेल. ह्यात 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा असेल, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.
त्याशिवाय ह्यात १६ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला असेल.
ह्याच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये 4G LTE, NFC, GPS आणि ब्लूटुथसारखे फीचर्स असतील. तर पॉवर बॅकअपसाठी 3000mAhची बॅटरीसुद्धा असू शकते.
ह्या स्मार्टफोनमध्ये मेटल यूनीबॉडी असेल, मात्र एलजीच्या मागील ४ सीरिज स्मार्टफोनमध्ये प्लॅस्टिक बॉडीचा उपयोग केला गेला होता. कंपनी लवकरच एलजी G5 लाँच करु शकते.