मोबाईल निर्माता कंपनी LeTV ने CES 2016 मध्ये आपला नवीन स्मार्टफोन Le Max Pro सादर केला होता. तथापि, लाँचवेळी कंपनीने ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. आता ह्या स्मार्टफोनची किंमत समोर आल्याचे सांगण्यात येतेय.
खरे पाहता ह्या नवीन लीकमध्ये ह्या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी खुलासा केला गेला आहे. चायनीज पब्लिकेशन मोबाईल-डेडवर दिल्या गेलेल्या माहितीनुसार LeTV Le Max Pro स्मार्टफोनची किंमत युआन 3500 (जवळपास ३४,८०० रुपये) असेल. मात्र अजूनपर्यंत कंपनीने ह्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
LeTV Le Max Pro स्मार्टफोनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात सर्वात खास गोष्ट म्हणजे, मेटल बॉडी डिझाइन असलेला हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 820 चिपसेटवर आधारित असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरचा उपयोग केला गेला आहे.
LeTV Le Max Pro स्मार्टफोनच्या वैशिष्ट्याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ६.३३ इंचाची IPS QHD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1440×2560 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन एड्रीनो 530 GPU आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 64GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे.
त्याचबरोबर ह्यात ड्यूल LED फ्लॅश असलेला 21 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात वायफाय, ब्लूटुथ, 4G LTE आणि GPS फीचर्स उपलब्ध आहे.