१३ मेगापिक्सेलच्या कॅमे-याने सुसज्ज आहे लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोन
लेनोवो ZUK Z1 स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 801 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लेनोवो ने भारतात आपला नवीन फोन ZUk Z1 लाँच केला. कंपनीने ह्या स्मार्टफोनला चीनमध्ये ऑगस्ट 2015 मध्ये लाँच केले होते. हा स्मार्टफोन ह्यासाठी खास आहे, की Cyanogemod १२.१ ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. Cyanogemod १२.१ अॅनड्रॉईड 5.1.1 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर फ्लॅश सेलच्या माध्यमातून उपलब्ध होईल.
लेनोवो ZUK Z1 एक मिड -रेंज स्मार्टफोन आहे. ह्यात 5.5 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ह्यात एक 100% NTSC कलर गमूट स्क्रीन दिली गेली आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 801 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा प्रोसेसर आपल्याला वनप्लस वन आणि वनप्लस X स्मार्टफोनमध्ये सुद्धा मिळतो. हा एक क्वाड-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 3GB ची रॅम देण्यात आली आहे. हा फोन 64GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे. ह्यात 4100mAH ची बॅटरी दिली गेली आहे. ह्यात एक पॉवर कट-ऑफ फीचरसुद्धा आहे, जो बॅटरी १००% चार्ज झाल्यावर आपोआप चार्जिंग बंद करतो.
ह्या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. हे कॅमेरे ड्यूल LED फ्लॅश आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह येतो. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा आहे. ह्या डिवाइसमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा आहे. ह्यात USB टाइप-C पोर्टसुद्धा दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – लॉजिटेक UE बूम 2 ब्लूटुथ स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये
हेदेखील वाचा – ९००० रुपये किंमतीत उत्कृष्ट बॅटरी लाइफ देणारे स्मार्टफोन्स